Join us

LIC IPO Date: एलआयसी आयपीओची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ओमायक्रॉन ठरू शकतो बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:20 IST

LIC IPO Update: अर्थ मंत्रालयाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे, एलआयसीने देखील या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.

एलआयसीचा आयपीओ कधी येणार आणि त्यात पैसे गुंतवून कधी मालामाल होणार अशी अवस्था अनेकांची झाली आहे. पेटीएमसारख्या कंपनीचा आयपीओ फुसका निघाल्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एलआयसीचा आयपीओ सामान्यांनाही खुनावत आहे. कारण एलआयसी पॉलिसीधारक देखील आयपीओमध्ये भाग घेऊ शकणार आहेत. अशातच एलआयसी आयपीओबाबत महत्वाची अपडेट आली आहे. 

एलआयसी आपल्या आयपीओसाठी याच महिन्यात जानेवारीच्या अखेरीस कागदपत्र जमा करण्याची शक्यता आहे. याच्याशी संबंधीत अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली आहे. तयारी सुरु असून ही कागदपत्रे लवकरच एक्स्चेंजना दिली जाऊ शकतात, असे ते म्हणाले. इकॉनामिक्स टाइम्सने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

जानेवारीच्या अखेरीस एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू किती आहे, कंपनी किती शेअर बाजारात आणणार आहे,याची माहिती मिळणार आहे. मात्र, त्यांनी हे देखील सांगितले की, कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनमुळे यामध्ये बदल देखील संभव आहे.

याबाबत अर्थ मंत्रालयाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे, एलआयसीने देखील या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही.यापूर्वी, वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की केंद्र सरकारने मार्च अखेरपर्यंत या IPO साठी आपली अंतिम मुदत निश्चित केली आहे. LIC मधील 5 किंवा 10 टक्के हिस्सेदारी विकून सुमारे 10 ट्रिलियन रुपये मिळवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

टॅग्स :एलआयसीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगएलआयसी आयपीओ