Join us  

एलआयसी गुंतवणूक पेटीएमच्या वाटेने? गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:01 AM

एलआयसीतील बडे गुंतवणूकदार एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपुष्टात येण्याची वाट पाहत आहेत.

मुंबई : गुंतवणूकदारांना श्रीमंतीची स्वप्ने दाखविलेल्या आणि बाजाराला नवीन चैतन्य मिळवून देण्याची आशा असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडाळाच्या (एलआयसी) शेअरने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी तो जवळपास २ टक्क्यांनी घसरून ७७५.१० या नव्या नीचांकी स्तरावर खाली आला आहे.एलआयसीचे शेअर सलग पाचव्या सत्रात लाल रंगात बंद होत  १० टक्क्यांनी कोसळले आहेत.  घसरणीने ‘एलआयसी’चे बाजार मूल्य ५ लाख कोटींच्या पातळीखाली गेले आहे. ‘एलआयसी’चे बाजार मूल्य ४.९७ लाख कोटी इतके झाले आहे.

आणखी घसरण्याची शक्यताएलआयसीतील बडे गुंतवणूकदार एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपुष्टात येण्याची वाट पाहत आहेत. तो पूर्ण झाला की गुंतवणूक काढून ते बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात शेअरमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. यामुळे एलआयसीचे समभाग पुन्हा उभारी घेतील की पेटीएम समभागांप्रमाणे आपले नुकसान होईल या चिंतेने गुंतवणूकदार धास्तावले आहेत.

गुंतवणूकदारांनी काय करावे?ज्यांनी एलआयसीचे समभाग घेतले नाहीत त्यांनी सध्या तरी एलआयसीचे शेअर्स घेणे टाळावे. तसेच ज्यांच्याकडे समभाग आहेत त्यांनी नुकसानीत समभाग काढून घेउ नये असा सल्ला बाजारतज्ज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :एलआयसी आयपीओशेअर बाजार