Join us  

तुमचा क्रेडिट स्कोअर 700 पेक्षा जास्त असेल तर LIC देईल कर्जावर मोठी सवलत; जाणून घ्या तुमचा स्कोअर कसा तपासायचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 2:42 PM

lic housing finance get cheap loan offer to customers : कोणत्याही ग्राहकाचा CIBIL स्कोअर, त्याने आधी कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही यावर अवलंबून आहे आणि जर त्याने ते घेतले असेल तर त्याने ते वेळेवर भरले आहे की नाही यावर अवलंबून आहे.

नवी दिल्ली : जर तुमचा सिबिल स्कोअर (CIBIL Score) 700 च्या वर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing finance) कमी व्याजदराने गृहकर्ज (Home loan) देत आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सने नवीन ग्राहकांचा व्याजदर 6.90 टक्के केला आहे. गृहकर्जावरील हा आतापर्यंतचा सर्वात कमी व्याजदर आहे. ज्या ग्राहकांचे CIBIL स्कोअर 700 किंवा त्यापेक्षा जास्त आहे, त्यांना या दराने कर्ज मिळेल. (lic housing finance get cheap loan offer to customers with 700 plus cibil score how to check)

कोणत्याही ग्राहकाचा CIBIL स्कोअर, त्याने आधी कोणतेही कर्ज घेतले आहे की नाही यावर अवलंबून आहे आणि जर त्याने ते घेतले असेल तर त्याने ते वेळेवर भरले आहे की नाही यावर अवलंबून आहे. CIBIL स्कोअर तपासताना अशा काही इतर पैलू देखील लक्षात ठेवल्या जातात.

एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या मते, 50 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होईल, जे CIBIL मध्ये 700 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असलेल्या ग्राहकांसाठी असेल. समान स्कोअरसह 80 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांसाठी 7 टक्के व्याज दर असेल.

CIBIL क्रेडिट स्कोअर कसे तपासायचे?

सिबिल वेबसाइटवर तुमचा क्रेडिट स्कोअर मोफत कसा तपासायचा, पाहा खालील प्रमाणे....>> सिबिल वेबसाइट https://www.cibil.com/ वर जा आणि पेजच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात 'Get Your CIBIL Score' वर क्लिक करा.>> हे तुम्हाला सब्सक्रिप्शन ऑप्शनवर घेऊन जाईल. मोफत पर्यायासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.>> आता अकाउंट तयार करा आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर 'अॅक्सेप्ट अँड कंटीन्यू' वर क्लिक करा.>> तुमची ओळख पडताळणी करावी लागते.>> तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) मिळेल. ओटीपी प्रविष्ट करा आणि 'कंटिन्यू' वर क्लिक करा.>> डॅशबोर्डवर जा तुम्हाला तुमची नावनोंदणी पुष्टीकरण दाखवणाऱ्या एका नवीन विंडोवर नेले जाईल.>> यासंदर्भात तुम्हाला एक ई-मेलही पाठवला जाईल. तुमचा क्रेडिट स्कोअर तपासण्यासाठी 'Go to Dashboard' वर क्लिक करा.>> सिबिल स्कोअर पाहा, तुम्हाला myscore.cibil.com वर पुनर्निर्देशित केले जाईल. येथे तुम्ही आपला सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट मोफत तपासू शकता.

टॅग्स :व्यवसायपैसा