Join us  

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; 9444 कोटींचा निव्वळ नफा, शुक्रवार महत्वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 8:17 PM

LIC Q3 Results: डिसेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 49 टक्क्यांनी वाढला.

LIC Q3 Results: देशातील आघाडीची विमा कंपनी LIC ने डिसेंबर तिमाहीचे निकाल आज जाहीर केले. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 49 टक्क्यांनी वाढून 9444 कोटी रुपये झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6334 कोटी रुपये होता. यासोबतच कंपनीने भागधारकांसाठी लाभांशही (डिव्हिडंट) जाहीर केला आहे. दरम्यान, आज शेअर साडे सहा टक्क्यांच्या वाढीसह 1112 रुपयांवर बंद झाला. तसेच, इंट्राडेमध्ये याने 1145 रुपयांचा सर्वकालीन उच्चांकही गाठला.

LIC Q3 रिझल्टशेअर बाजाराला दिलेल्या माहितीत एलआयसीने सांगितले की, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत त्यांचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न वाढून 1,17,017 कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 1,11,788 कोटी रुपये होते. LIC चे एकूण उत्पन्न समीक्षाधीन तिमाहीत वाढून रु. 2,12,447 कोटी झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,96,891 कोटी होते.

LIC डिव्हिडंट डिटेल्स

कंपनीच्या बोर्डाने 10 रुपयांच्या दर्शनी मूल्याच्या आधारे भागधारकांना 40 टक्के, म्हणजेच प्रति शेअर 4 रुपये लाभांश जारी केला आहे. पुढील 30 दिवसांत हा लाभांश दिला जाईल. सध्या एक्सचेंजवर रेकॉर्ड डेटबद्दल कोणतीही माहिती नाही.

पीएम मोदींनी उल्लेख केल्यानंतर शेअर वाढलापीएम मोदींनी गुरुवारी राज्यसभेत एलआयसीचा उल्लेख केला आणि सांगितले की, हा शेअर सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत आहे. परिणामी, या शेअरने सुमारे 10 टक्क्यांनी झेप घेतली आणि इंट्राडे 1145 रुपयांच्या नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. मात्र, अखेर तो 1112 रुपयांच्या पातळीवर बंद झाला. हा शेअर सलग 5 ट्रेडिंग सत्रात वाढीसह बंद होत आहे. या वाढीमध्ये हा शेअर 937 रुपयांवरुन 1112 रुपयांच्या पातळीवर पोहोचला, म्हणजे 18 टक्क्यांनी वाढ झाली.

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक