Join us  

पेट्रोल-डिझेलची चिंता सोडा; 1 रुपये प्रति किमीपेक्षाही कमी खर्च, TATAची ही कार देतेय जबरदस्त रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 4:53 PM

'या' कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो.

 नवी दिल्ली - आजकाल पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशात लोकांचा कल इलेक्ट्रिक कारकडे वाढत असल्याचे दिसते. खरे तर, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारने प्रवास करण्यासाठी फार कमी खर्च लागतो. अशात, पेट्रोल आणि डिझेलच्या महागड्या किंमतीचा त्रास टाळायचा असले, तर Tigor EV तुमच्यासाठी एक चांगला पर्याय बनू शकतो. (Leave the worry of petrol-diesel; TATA Tigor EV traveling Costing less than Rs 1 per km)

टाटा मोटर्स (Tata Motors)ने नुकतीच Tata Tigor EV (टाटा टिगोर इलेक्ट्रिक कार) भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ते 12.99 लाख रुपयांपर्यंत आहे. ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जवर 306 किलो मीटरपर्यंत रेंज देते.

पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमुळे होईल जबरदस्त बचत -टाटा टिगोर EV ची किमान एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे. तर पेट्रोलवर चालणाऱ्या टाटा टिगोरच्या टॉप व्हेरिएंट मॉडेलची किंमत 7.82 लाख रुपये एवढी आहे. तसेच, टाटा टिगोर इलेक्ट्रिक कारने 1 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी 1 रुपयापेक्षाही कमी खर्च येतो. तर, पेट्रोल टिगोरने 1 किमीचा प्रवास करण्यासाठी 5 ते 6 रुपये खर्च येतो. अर्थात, पेट्रोल टाटा टिगोरच्या तुलनेत इलेक्ट्रिक टाटा टिगोरवर ग्राहकांची मोठी बचत होईल.

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोणती? भारतात या 5 कारचा बाजारावर कब्जा!

Tata Tigor EV: परफॉर्मेंस -ही इलेक्ट्रिक कार Ziptron पॉवरट्रेनवर काम करते. यात लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही IP-67 सर्टिफिकेशन आणि 8 वर्षांच्या वॉरंटीसह येते. नवीन Tigor EV मध्ये 26 kWh उच्च घनतेची लिथियम-आयन बॅटरी आहे. यात पर्मनन्ट मॅगनेट सिंक्रोनस इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. या कारची इलेक्ट्रिक मोटर 74.7 PS की मॅक्सिमम पावर आणि 170 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल.

Tata Tigor EV: चार्जिंग -15A च्या रेग्युलर चार्जिंग प्वाइंटने या कारची बॅटरी 0-80 टक्के चार्ज करण्यासाठी 8 तास 45 मिनिटे लागतात. तर, 25 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 65 मिनिटांच्या आत ही कार 0-80 टक्के चार्ज होऊ शकते.

नवीन टाटा टिगोर ईव्हीमध्ये हिल एक्सेंट, हिल डिसेंट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्स, ABS with EBD सह CSC म्हणजेच कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल असे फिचर्स मिळतील. टाटा मोटर्सचा असा दावा आहे की, नवीन टिगोर ईव्ही ही देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक सेडान कार असेल. 

टॅग्स :टाटाव्यवसायकारइलेक्ट्रिक कार