Join us
Daily Top 2Weekly Top 5

१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:00 IST

Laxmi Vilas Palace: जेव्हा जेव्हा देशातील महागड्या घरांचा उल्लेख येतो, तेव्हा मुकेश अंबानींच्या अँटिलियाचं नाव सर्वप्रथम येतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अँटिलियापेक्षाही मोठं आणि महागडं घर गुजरातच्या बडोदे येथे आहे.

Laxmi Vilas Palace: जेव्हा जेव्हा देशातील महागड्या घरांचा उल्लेख येतो, तेव्हा मुकेश अंबानींच्या अँटिलियाचं नाव सर्वप्रथम येतं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अँटिलियापेक्षाही मोठं आणि महागडं घर गुजरातच्या बडोदे येथे आहे. त्याचं नाव लक्ष्मी निवास पॅलेस (Laxmi Vilas Palace) आहे.

लक्ष्मी निवास पॅलेस सुमारे ५५० एकर परिसरात पसरलेला आहे. हा राजवाडा केवळ भारतातच नव्हे, तर जगातील सर्वात मोठं शाही निवास आहे. हा राजवाडा इतिहास, संस्कृती आणि भव्यतेचं प्रतीक आहे. हे गायकवाड शाही कुटुंबाचं वडिलोपार्जित घर देखील आहे.

महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला

हा पॅलेस १८८० च्या दशकात महाराजा सयाजीराव गायकवाड III यांनी बांधला होता. त्यांनी आपली पत्नी महारानी लक्ष्मी बाई यांच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलं, ज्यांच्याशी त्यांनी १८८० मध्ये विवाह केला होता. हा राजवाडा इंडो-सारासेनिक शैलीत बांधलेला असून, यात अनेक महागड्या कलाकृती आहेत.

अँटिलियापेक्षाही महाग आणि मोठा

लक्ष्मी निवास पॅलेस अँटिलियापेक्षाही महागडा असल्याचं सांगितलं जातंय विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, लक्ष्मी निवास पॅलेसची किंमत २४ हजार कोटी रुपये आहे. तर मुकेश अंबानींच्या अँटिलियाची किंमत १५ हजार कोटी रुपये आहे. लक्ष्मी निवास पॅलेसमध्ये आता गायकवाड कुटुंबाचे प्रमुख राजे समरजीतसिंह गायकवाड, त्यांच्या पत्नी महाराणी राधिका राजे गायकवाड आणि त्यांच्या मुली राहतात.

हा पॅलेस अंबानींच्या अँटिलियापेक्षा सुमारे ५०० पट मोठा आहे. लक्ष्मी निवास पॅलेस सुमारे ५५० एकरमध्ये पसरलेला आहे, तर अँटिलियाचा आकार १.१२ एकर आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या मते, अँटिलियामध्ये ४९ बेडरूम आहेत, तर लक्ष्मी निवास पॅलेसमध्ये १७० खोल्या आहेत. लक्ष्मी निवास पॅलेस यूकेच्या बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठा आहे.

१७० खोल्या आहेत

लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये १७० खोल्या आहेत. तसेच, यात एक खाजगी संग्रहालय, वैयक्तिक क्रिकेट मैदान आणि वैयक्तिक गोल्फ कोर्स देखील आहेत. याशिवाय, यात एक खूप मोठा दरबार हॉल आहे. हे बांधकाम करण्यासाठी राजस्थानातील संगमरवर, आग्राच्या विटा, पुण्याचे निळे दगड, इटलीचं फ्लोअरिंग आणि बेल्जियमच्या काचेचा वापर करण्यात आला आहे.

राजवाड्यातील शाही शस्त्रांचा संग्रह

या पॅलेसमध्ये आजही शाही शस्त्रांचा संग्रह अस्तित्वात आहे. यात नवदुर्गा तलवार, पंचकुला तलवार, नागिन तलवार (याची धार विषारी होती) इत्यादींचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Laxmi Vilas Palace: India's largest home, four times bigger than Buckingham.

Web Summary : Gujarat's Laxmi Vilas Palace, built in 1880, dwarfs Mukesh Ambani's Antilia. Spanning 550 acres with 170 rooms, it boasts a private museum, cricket ground, and golf course. Valued at ₹24,000 crore, it's four times larger than Buckingham Palace.
टॅग्स :गुजरातमुकेश अंबानी