नवी दिल्लीः पॅन कार्ड हे व्यवहारात महत्त्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे. प्राप्तिकर विभागानं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवून दिली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्याची तारीख वाढवून दिल्यानंतरही 17 कोटी असे आहेत, ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अद्याप लिंक केलेलं नाही. पॅन कार्डला युनिक नंबर असतो.दोन जण किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण जर कोणाकडे दोन पॅन कार्ड सापडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. काही जणांकडे अशा प्रकारे दोन पॅन कार्ड असले तरी ते कसे सरेंडर करायचे हे त्यांना माहीत नसतं. कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या कचाट्यात सापडण्याऐवजी लवकरात लवकर दुसऱ्या पॅनकार्डपासून मुक्तता मिळवणं फायदेशीर असतं. त्यासाठी आम्ही यासंबंधीची सर्व माहिती देणार आहोत. लागू शकतो 10 हजार रुपयांचा दंड- जर कोणाकडेही अतिरिक्त पॅन कार्ड असल्यास प्राप्तिकर कायदा 1961अंतर्गत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:03 IST
पॅन कार्ड हे व्यवहारात महत्त्वाचं असतं. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे.
पॅन कार्डबाबत ही चूक केलेली नाही ना?; भरावा लागेल 10 हजारांचा दंड
ठळक मुद्देपॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची तारीखही जवळ आलेली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केल्याची तारीख वाढवून दिल्यानंतरही 17 कोटी असे आहेत, ज्यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड अद्याप लिंक केलेलं नाही. दोन जण किंवा दोन कंपन्यांचे पॅन नंबर एकसारखे असू शकत नाहीत हे सगळ्यांनाच माहीत आहे