Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी घटली, संधी वाढली; केंद्र सरकारची आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 10:37 IST

महिलांच्या रोजगारामध्ये वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने नुकताच जुलै २०२३ ते जून २०२४ यादरम्यानचा कामगार क्षेत्रातील रोजगाराच्या संधींसंदर्भात २०१७-१८चा पीएलएफएस सर्व्हे प्रसिद्ध केला असून, यानुसार गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये बेरोजगारी कमी होत असून, महिलांच्या रोजगारामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८.२ टक्के दराने वाढ केली. ही वाढ सुरुवातीच्या अंदाजापेक्षा खूप जास्त असून, जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान अधिकाधिक मजबूत होत आहे. मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांत देशाचा जीडीपी सरासरी ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे.

१९.४ लोक त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात मदत करतात. त्यांना वेगळे वेतन दिले जात नाही. कृषी क्षेत्रात सर्वाधिक ८२% स्वयंरोजगार आहेत तर १७ टक्के रोजंदारी करणारे आहेत.

कुठे सर्वाधिक बेरोजगारी?

केरळ     ७.२%तेलंगणा     ४.८%राजस्थान     ४.२%आंध्र प्रदेश     ४.१%आसाम     ३.९%तामिळनाडू     ३.५%महाराष्ट्र     ३.३%उत्तर प्रदेश     ३.१%बिहार     ३.०% कर्नाटक     २.७%प. बंगाल     २.५%गुजरात     १.१%मध्य प्रदेश     १.०% 

०६ वर्षांच्या बेरोजगारीचा दर पाहिला तर, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये रोजगाराच्या संधीचे प्रमाण येथे सर्वात कमी आहे.

११ प्रमुख राज्यांत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ७२.७ टक्के स्वयंरोजगार आहेत.

महिलांच्या रोजगारात वाढ

२०१७-१८ पासून महिलांच्या रोजगारात वाढ झाल्याचे दिसून येते. २०१७ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २२% महिला रोजगार करत होत्या. त्यात वाढ होत हे प्रमाण ४०.३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

यात ६७.४% महिला स्वयंरोजगार करत असून, पगारी कर्मचारी म्हणून १५.९% महिला आहेत तर रोजंदारीवर १६.७% महिला जात आहेत.