Join us

अमेरिकेला ठेंगा, रशियन तेलाची सर्वाधिक खरेदी! भारत ठाम, इराक आणि साैदी अरबकडील खरेदीत कपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 08:24 IST

कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत भारताने साैदी अरब आणि इराकला धक्का दिला आहे.

नवी दिल्ली :

कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत भारताने साैदी अरब आणि इराकला धक्का दिला आहे. आखाती देशांकडून हाेणारी खरेदी कमी केली असून,जुना मित्र रशिया हा भारताचा सर्वात माेठा पुरवठादार ठरला आहे. ऑक्टाेबरमध्ये रशियाकडून भारताने ९ लाख ३५ हजार ५५६ बॅरल्स एवढे कच्चे तेल दरराेज खरेदी केले आहे. कच्च्या तेलाच्या आयातीपैकी रशियाकडून भारताने २२ टक्के खरेदी केली आहे. युक्रेन युद्धानंतर या खरेदीत प्रचंड वाढ झालेली आहे. 

‘व्हाेर्टेक्सा’ कार्गाे ट्रॅकर संस्थेच्या अहवालातून ही माहिती समाेर आली आहे. या युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून केवळ ०.२ टक्के कच्चे तेल खरेदी करत हाेता. युद्धानंतर जगभरात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले. अशा वेळी भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढविण्याचा निर्णय घेतला. युक्रेन युद्धानंतर पश्चिमेकडील देशांनी रशियावर निर्बंध घातले. अमेरिकेनेही भारताकडे डाेळे वटारून रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी दबाव आणला हाेता. मात्र,दबाव झुगारून भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढविली आहे. 

युद्धापूर्वीची स्थिती (डिसेंबर २०२१) बॅरल्स दरराेजइराक          १० लाख  साैदी अरब         ९.५३ लाखरशिया         ३६ हजार 

- सध्या सुमारे ९२ डाॅलर्स प्रति बॅरल कच्च्या तेलाचे दर आहेत. प्रति बॅरल ३० डाॅलर्स रशियाकडून भारतासाठी सूट - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीपेक्षा सुमारे २५ ते ३५ टक्के कमी दर- रशियाकडून तेलखरेदी वाढविल्यामुळे भारताने युक्रेन युद्धानंतर ३५ हजार काेटी रुपयांची बचत केली आहे.

कच्च्या तेलाचे दर $१३८ प्रति बॅरल एवढ्या उच्चांकी पातळीवर पाेहाेचले हाेते. 

रशियन तेलाची खरेदी (दरराेज)मार्च     ०.६८ एप्रिल     २.६६जून     ९.४२ऑगस्ट     ८.३५सप्टेंबर     ८.७६आकडे : (लाख बॅरल्स)जानेवारी व फेब्रुवारीमध्ये भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नव्हते.ऑक्टाेबरमध्ये भारताची खरेदी२२% रशिया१६% साैदी अरब२०.५% इराक  भारताची लाेकसंख्या १.३४ अब्ज एवढी आहे. त्यांची गरज पूर्ण करणे आमचे कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी स्वस्त असेल तेथून भारत कच्चे तेल खरेदी करणार. अजूनही युराेप रशियाकडून एका दिवसात दुपारपर्यंत जेवढे तेल खरेदी करताे त्यातुलनेत हे केवळ एक चतुर्थांश आहे. - हरदीप सिंह पुरी, पेट्राेलियम मंत्री

टॅग्स :रशियातेल शुद्धिकरण प्रकल्प