नवी दिल्ली : व्यासायिक बँकांसाठी ग्राहकांच्या नियमित (पिरियॉडिक) केवायसीच्या अद्ययावतीकरणास रिझर्व्ह बँकेने तीन महिन्यांची म्हणजेच ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.ही मुदत ३१ डिसेंबरला संपणार होती. तथापि, कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धोक्याने अनिश्चितता निर्माण झाल्यामुळे ही मुदत वाढविण्यात आली आहे. वाढीव मुदतीपर्यंत केवायसीअभावी कोणतेही आर्थिक व्यवहार रोखण्यात येऊ नयेत, अशा सूचना रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिल्या आहेत.
बँकांच्या केवायसीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ, रिझर्व्ह बँकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 05:53 IST