Join us

कुकर्जाचा आर्थिक पुनरुज्जीवनास धोका  - डी. सुब्बराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:48 IST

d. subbarao :

नवी दिल्ली : जगात सर्वांत वाईट स्थितीत असलेल्या भारतातील कुर्जाचा भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनास (रिकव्हरी) मोठा धोका आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी आपल्या नव्या पुस्तकात केले आहे.सुब्बराव यांचे ‘पँडेमोनियम : द ग्रेट इंडियन बँकिंग ट्रॅजेडी’ हे पुस्तक लवकरच प्रसिद्ध होणार आहे. त्यात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. पुस्तकात म्हटले आहे की, कोविड-19 महामारीमुळे महसुलात मोठी घट झाली आहे. त्यामुळे बँकांना मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात निधीच नाही. सुब्बराव यांनी सांगितले की, कुकर्जाची समस्या मोठी आणि वास्तविक आहे. तथापि, सरकारची घसरती वित्तीय स्थिती त्याहीपेक्षा मोठी व वास्तविक आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँककोरोना वायरस बातम्या