Join us  

पैसे गुंतवताय? मग लक्षात ठेवा काही महत्त्वाचे धडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 9:02 AM

कुणी म्हणतं मोठा आला इन्व्हेस्टर!!..काहीही करा, गुंतवणुकीत घाटाच होतो. यावर उपाय काय? वाचा काही महत्त्वाचे सल्ले.

पी. व्ही. सुब्रमण्यम, आर्थिक सल्लागारआम्ही ठरवतो आता जरा शिस्त लावायची स्वत:च्या पैशाला, गुंतवणुकीला. पण, काहीतरी चुकतंच आणि लोक हसतात. नावं ठेवतात. कुणी म्हणतं मोठा आला इन्व्हेस्टर!!..काहीही करा, गुंतवणुकीत घाटाच होतो. यावर उपाय काय? -तरुण असे प्रश्न कळकळीने विचारतात. तर त्यावर एका म्हाताऱ्या इन्व्हेस्टरचे हे काही व्यावहारिक सल्ले लक्षात ठेवा..१. चुका करा. फक्त काय चुकलं ते लिहून ठेवा. लहानसहान चुका होणारच, त्यावर खळखळून हसा. तुम्ही जितके जास्त तरुण, तितक्या जास्त चुका कराल. मुद्दा एकच, त्या चुकांतून शिका, पुन्हा तीच चूक करायची नाही.२. कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट समजून घ्या. ब्रोकर, ब्लॉगर, ॲडव्हायजर यांचा एक अजेंडा असतो. त्यांचा सल्ला, त्यांचे आडाखे, तुमची मतं नाही जुळणार याचा अर्थ ते चूक किंवा तुम्ही चूक असं नाही, स्वत:चं डोकं वापरा. स्वत:चं ऐका. ३. त्यातूनही चुका झाल्या तर त्या चुकांतून आपण काय शिकलो, काय गमावलं. माणसं तुटली की पैसा बुडाला, नेमकं नुकसान काय आणि कशाने झालं लिहून ठेवा. पुढच्या वेळी निर्णय घेताना या धड्यांचा फायदाच होतो.४. मित्र, सल्लागार जरा विचार करून जमवा. त्यांचे सल्लेही काळजीपूर्वक ऐका, त्यातलं जे योग्य वाटेल तेच स्वीकारा.५. कोण असावेत तुमचे मित्र?- काही पूर्ण पागल, पैसा बुडवणारे नमुने.. काही असे की त्यांनी जिथं हात लावला तिथं सोनं होतं. दोघांचेही सल्ले आपल्या फायद्याचे. इक्विटी ॲनालिस्ट, विक्रेते, वकील, उद्योजक यांची विचार करण्याची पद्धत पाहा. ती शिका, आपले निर्णय घेताना त्याचा फार उपयोग होतो.६. जे लोक तुमच्यावर कायम टीका करतात त्यांच्याशी दोस्ती करा. ते जितक्या चुका फुकट सांगतात, तितके आपण सेफ.७.निर्णय घेताना ८० टक्के निर्णय फक्त आणि फक्त माहितीच्या आधारे घ्या, २० टक्के तुमचं गट फिलिंग.८. कमाईच्या १ टक्के गुंतवणूक करून तुमच्या आयुष्यात फार काहीच फरक पडत नाही.  तुमच्या एकूण उत्पन्नाच्या किमान ५ टक्के तरी गुंतवणूक करा.११. चुका झाल्या म्हणून लगेच घाबरून जाऊ नका. वस्तुनिष्ठपणे आणि व्यवहार्य निर्णय घेण्याची सवय लावा, पैसा वाढीस लागेल.

टॅग्स :गुंतवणूकपैसा