Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासाठी टर्म इन्शुरन्स घेताना लक्षात ठेवा या १० खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 06:08 IST

विमा रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट असावी. विमा कालावधी निवृत्ती व आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन ठरवावा.

टर्म इन्शुरन्स पॉलिसीची खरेदी करताना केवळ करबचत हा हेतू नसावा. याचे मुख्य उद्दिष्ट कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे हा असावा. इन्शुरन्स घेताना १० गोष्टी नीट तपासून घ्याव्यात. 

विमा रक्कम तुमच्या उत्पन्नाच्या किमान १० ते १५ पट असावी. विमा कालावधी निवृत्ती व आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन ठरवावा. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पॉलिसी व प्रीमियमची तुलना करावी. क्लेम सेटलमेंटचे प्रमाण ९५ टक्केपेक्षा अधिक असलेली कंपनी निवडावी. मासिक, त्रैमासिक, वार्षिक किंवा सिंगल प्रीमियम यापैकी सोयीचा पर्याय निवडा. मृत्यूसंबंधी असलेल्या अटी समजून घ्याव्या. ऑफलाइन तुलनेत ऑनलाइन पॉलिसी स्वस्त मिळू शकते त्यामुळे ऑनलाइन प्लॅनचा विचार करावा. आरोग्यविषयक व वैयक्तिक माहिती प्रामाणिकपणे द्यावी अन्यथा भविष्यात दावा फेटाळला जाऊ शकतो. पॉलिसी मिळाल्यानंतर १५ ते ३० दिवसांचा ‘फ्री लूक पीरियड’ मिळतो या काळात पॉलिसी रद्द करता येते.

विमा अर्ज एजंटकडून भरून घेऊ नका. पॉलिसी खरेदी करताना नामांकन भरायला विसरू नका. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमच्या विम्याची माहिती द्या आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या. टर्म इन्शुरन्स घेतल्यानंतर क्रिटिकल इलनेस कव्हर किंवा कॅन्सर कव्हर सारखा अतिरिक्त विमा घ्यावा.