Join us

करनीती : मार्चअखेर करायची महत्त्वाची कामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 13:20 IST

अचल संपत्तीची पडताळणी करून  खाते पुस्तकासोबत पडताळणी  करावी.

- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट

अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी मार्चअखेरीस करावयाच्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या?कृष्ण : अर्जुन, करदात्यांसाठी प्रमुख गोष्टी.. १. ॲडव्हान्स टॅक्स : वर्ष २०२२-२३ चा शेवटचा आगाऊ कर हप्ता ३१ मार्चपर्यंत भरावा जेणे करून कमी व्याज भरावे लागेल.२. कर कपातीसाठीची गुंतवणूक : करदात्याने त्याच्या आयकराची मर्यादा, कराची देय रक्कम आणि गुंतवणूक इ. ३१ मार्च २०२३ पूर्वी पडताळून पहावे. ३. पगारावरील टीडीएस : कर्मचाऱ्यांनी त्यांच्या गुंतवणुकीची आणि वजावटीची माहिती त्याच्या कार्यालयात द्यावी, जेणेकरून मार्च महिन्यात कमी टीडीएस कापला जाईल.४. आधार पॅन जोडणी : पॅनधारक जे आयकर रिटर्न भरण्यास पात्र असतात, त्यांना आधार पॅन यांची जोडणी अनिवार्य आहे. जर आधार आणि पॅन ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक नाही केले तर करदात्याला पॅन संबंधित व्यवहार करता येणार नाही.५. वार्षिक माहिती पत्रक (फॉर्म २६ एएस): फॉर्म २६ एएस डाउनलोड करून टीडीएस कापलेला आहे की, नाही हे पडताळून पाहावे. त्याचप्रमाणे फॉर्म २६ एएस आणि एआयएसमध्ये (वार्षिक माहितीपत्रक) दिसणारे उत्पन्न खातेपुस्तकासोबत पडताळून पाहावे. दोन लाखांवरील म्युच्युअल फंडाची खरेदी, १० लाखांवरील चारचाकीची खरेदी, ५० लाखांवरील संपत्तीची खरेदी-विक्री फॉर्म २६ एएसमध्ये येते आहे की, नाही हेही पडताळून पाहावे. ६. फॉर्म १५ G/H : ज्या करदात्यांचे उत्पन्न फक्त व्याजाच्या रूपात आहे आणि ते मर्यादेपेक्षा कमी आहे. ते फॉर्म १५ G/H भरू शकतात.७. वैधानिक थकबाकीची वजावट : जर करदात्याची लेखाप्रणाली रोखावर आधारित असेल आणि त्याला त्याच्या वैधानिक थकबाकीच्या पेमेंटची वजावट घ्यावयाची असेल तर त्याने ते पेमेंट ३१ मार्चपूर्वी करावे.८. घसाऱ्याची मोजणी :  संपत्तीवरील घसाऱ्याची मोजणी वर्ष संपण्याच्या वेळी करावी.९. क्लोजिंग स्टॉकची पडताळणी : स्टॉकची पडताळणी वर्ष संपण्याच्या वेळी करावी. त्याचबरोबर अचल संपत्तीची पडताळणी करून  खाते पुस्तकासोबत पडताळणी  करावी.

 

टॅग्स :कर