Join us  

Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 2:13 PM

Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. कंपनीच्या शेअर्सनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.

Jupiter Wagons Share Price : रेल्वे कंपनी ज्युपिटर वॅगन्सचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. गुरूवारी ज्युपिटर वॅगन्सचा शेअर १० टक्क्यांनी वधारून ४४८.७५ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनं गुरुवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. मार्च २०२४ तिमाहीत दमदार नफ्यानंतर ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्समध्ये ही जोरदार वाढ झाली आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअर्सनं गेल्या ४ वर्षांत छप्परफाड रिटर्न दिले आहेत.या काळात कंपनीचे शेअर्स ८ रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत वधारले आहेत. 

जानेवारी ते मार्च २०२४ या तिमाहीत ज्युपिटर वॅगन्सचा (Jupiter Wagons) नफा दुपटीनं वाढून १०४.२२ कोटी रुपये झालाय. ज्युपिटर वॅगन्सला गेल्या वर्षी याच कालावधीत ४०.७८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्च २०२४ तिमाहीत कंपनीचं एकूण उत्पन्न ११२१.३४ कोटी रुपये होतं, जे मागील वर्षी याच कालावधीत ७१२.७१ कोटी रुपये होतं. ३१ मार्च २०२४ पर्यंत कंपनीची ऑर्डर बुक ७,१०१.६६ कोटी रुपयांची होती. 

८ रुपयांवरून ४०० पार गेला शेअर 

गेल्या ४ वर्षात रेल्वे कंपनीचे शेअर्स ५५४० टक्क्यांनी वधारले आहेत. १५ मे २०२० रोजी ज्युपिटर वॅगन्सचा शेअर ७.८९ रुपयांवर होता. कंपनीचा शेअर ९ मे २०२४ रोजी ४४८.७५ रुपयांवर पोहोचला आहे. तर ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात ३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ९ मे २०२३ रोजी ज्युपिटर वॅगन्सचा शेअर १०८.८५ रुपयांवर होता.  

कंपनीचा शेअर ९ मे २०२४ रोजी ४४८.७५ रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ४४८.७५ रुपये आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १०७.४५ रुपयांवर पोहोचला. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक