Join us

२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स

By जयदीप दाभोळकर | Updated: April 17, 2025 15:18 IST

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो.

रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या भारतातील तीन प्रमुख टेलिकॉम कंपन्या आहेत. देशात जिओचे सर्वाधिक मोबाइल युजर्स असून त्याखालोखाल एअरटेलचा क्रमांक लागतो. तर युजर्सच्या बाबतीत व्हीआय तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सला खूप चांगले रिचार्ज प्लान ऑफर करतात. स्वस्तापासून ते महागपर्यंत सर्व प्रकारचे रिचार्ज प्लान तुम्हाला मिळतील.

आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्हीआयच्या अशाच रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला जवळपास २०० रुपयांच्या किंमतीत मोठा फायदा मिळणार आहे. हे रिचार्ज प्लान अशा युजर्ससाठी उत्तम आहे ज्यांना कमी किंमतीत आपलं सिम अॅक्टिव्ह ठेवायचं आहे. चला जाणून घेऊया.

जिओचा १८९ रुपयांचा प्लान

जिओचा १८९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसंच २ जीबी डेटा आणि ३०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.

एअरटेलचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानची वैधता ही २८ दिवसांची आहे. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.

व्हीआयचा २०९ रुपयांचा प्लान

व्हीआयच्या २०९ रुपयांच्या प्लॅनमध्येही संपूर्ण २८ दिवसांची वैधता मिळते. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. तसंच २ जीबी डेटा आणि ३०० फ्री एसएमएसही मिळणार आहेत.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)एअरटेलरिलायन्स जिओ