Join us

टाटांच्या साैद्याला ‘टाटा’; ‘ती’ हाेणार पाणीवाली बाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 09:33 IST

Jayanti Chauhan : रमेश चौहान यांनी माध्यमांना सांगितले की, जयंती आता कंपनी चालवेल. 

नवी दिल्ली : बाटलीबंद पाणी क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘बिसलेरी इंटरनॅशनल’चे चेअरमन रमेश चौहान यांची कन्या जयंती चौहान यांच्याकडे आता कंपनीचे नेतृत्व देण्यात येणार आहे. रमेश चौहान यांनी माध्यमांना सांगितले की, जयंती आता कंपनी चालवेल. 

जयंती यांनी फेटाळली हाेती जबाबदारी४२ वर्षीय जयंती चौहान या सध्या बिसलेरी इंटरनॅशनलच्या व्हाईस चेअरपर्सन आहेत. सीईआ एंजेलो जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्षम व्यवस्थापनासोबत जयंती चौहान काम करतील. त्यांनी आधी ‘बिसलेरी’ची जबाबदारी घेण्यास नकार दिला हाेता. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला होता. टाटा समूहासोबत त्यांची चर्चा सुरू होती. ती बाेलणी फिसकटली.

टॅग्स :टाटाव्यवसाय