नवी दिल्ली - नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे. मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही.या निर्णयाबाबत एनपीसीआयने सांगितले की, थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनपीसीआये हा निर्णय भविष्यात कुठल्याही थर्ड पार्टी अॅपची एकाधिकारशाही रोखण्यासाठी आणि त्याला आकाराच्या मनाने मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अॅपची एकाधिकारशाही राहणार नाही. ३० टक्के कॅप निर्धारित करण्यात आल्याने आता गुगल पे, अॅमेझॉन पे, फोनपे सारख्या कंपन्या यूपीआयअंतर्गत होणाऱ्या एकूण ट्रान्झॅक्शनमध्ये कमाल ३० टक्के ट्रान्झॅक्शनचीच तरतूद करू शकतील.
१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम
By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 14:25 IST
UPI payments News : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
१ जानेवारीपासून UPI पेमेंटमध्ये होणार मोठा बदल, पेमेंट अॅपच्या ग्राहकांवर होणार असा परिणाम
ठळक मुद्देUPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार मात्र या नियमाचा परिणाम पेटीएमच्या ग्राहकांवर होणार नाही