Join us
Daily Top 2Weekly Top 5

जन धन ठेवी ९० हजार कोटींच्या टप्प्यात; सर्वाधिक खाती महिलांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:51 IST

जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे.

नवी दिल्ली : जन धन या महत्त्वाच्या आर्थिक कार्यक्रमात अधिकाधिक लोकांना सामावून घेण्यासाठी सरकारने अपघात विम्याचे संरक्षण (कव्हर) दुपट्ट म्हणजे दोन लाख रुपये केल्यामुळे जन धन खात्यांतील एकूण ठेव ९० हजार कोटी रुपयांच्या पुढे जाण्याच्या पायरीवर आहे.अर्थमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जन धन खात्यांतील जमा रक्कम मार्च, २०१७ पासून स्थिरपणे वाढत असून, आता ती रक्कम ३० जानेवारी रोजी ८९,२५७.५७ कोटी झाली आहे. २३ जानेवारी रोजी ही जमा रक्कम ८८,५६६.९२ कोटी रुपये झाली आहे. प्रत्येक घराचे बँकेत खाते असावे, या हेतूने प्रधानमंत्री जन धन योजना (पीएमजेडीवाय) २८ आॅगस्ट, २०१४ रोजी सुरू करण्यात आली. या योजनेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर सरकारने २८ आॅगस्ट, २०१८ नंतर जी नवी खाती सुरू केली त्यांच्यासाठी अपघात विम्याचे संरक्षण एक लाखांऐवजी दोन लाख रुपये केले आहे. या खात्यातील ओव्हरड्रॉफ्टची मर्यादाही दुप्पट करून १० हजार रुपये केली गेली आहे.प्रत्येक घराचे बँक खाते या धोरणाऐवजी सरकारने आता बँकेत खाते नसलेल्या प्रत्येक प्रौढला खाते यावर लक्ष केंद्रित केले आहे.ताज्या आकडेवारीनुसार, पीएमजेडीवायअंतर्गत ३४१.४ दशलक्ष खातेधारक आहेत. या खात्यात सरासरी रक्कम २५ मार्च, २०१५ रोजी १,०६५ रुपये होती ती आता २,६१५ रुपये झाली आहे.जन धन खात्यांपैकी ५३ टक्के खाती ही महिलांची असून, ५९ टक्के खाती ही ग्रामीण आणि निम-शहरी भागांतील आहेत. उपलब्ध माहितीनुसार, २७२.६ दशलक्ष खातेधारकांना रुपे डेबिट कार्ड्स अपघात विम्याच्या संरक्षणासह दिली गेली आहेत.सरासरी रक्कम १,०६५ वरून २,६१५ रुपयांवरताज्या आकडेवारीनुसार पीएमजेडीवायअंतर्गत ३४१.४ दशलक्ष खातेधारक आहेत. या खात्यात सरासरी रक्कम २५ मार्च, २०१५ रोजी १,०६५ रुपये होती, ती आता २,६१५ रुपये झाली आहे.

टॅग्स :व्यवसाय