नुकत्याच दिल्लीत झालेल्या एआय समिटमध्ये भल्याभल्या कंपन्यांच्या सीईओंनी एआय नोकरी हिसकावणार नाही असे ठासून सांगितले असले तरीही जमिनीवरील परिस्थिती त्याच्या प्रचंड विपरीत आहे. कारण ट्विटरचे (आताचे 'X') सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांच्या नेतृत्वाखालील वित्तीय तंत्रज्ञान कंपनी 'ब्लॉक'ने आपल्या एकूण कर्मचारी वर्गापैकी सुमारे ४० टक्के लोकांची कपात करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना काढताना कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि प्रगत इंटेलिजन्स टूल्सच्या वाढत्या वापरामुळे ही मोठी कपात करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे ४,००० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत.
नफ्यात असूनही 'ले-ऑफ' का?सहसा कंपन्या आर्थिक संकट किंवा तोटा झाल्यावर कर्मचाऱ्यांना काढून टाकतात, मात्र जॅक डॉर्सी यांनी स्पष्ट केले की, कंपनीचा नफा सतत वाढत आहे आणि व्यवसाय मजबूत आहे. तरीही, कंपनीच्या नवीन 'इंटेलिजेंस स्ट्रॅटेजी'मुळे कमी लोकांमध्ये जास्त काम करणे शक्य झाले आहे. डॉर्सी यांच्या मते, "इंटेलिजेंस टूल्समुळे छोट्या टीम्स आता अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात, त्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज उरलेली नाही." या कपातीनंतर कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या १०,००० वरून ६,००० पर्यंत खाली येईल.
कर्मचाऱ्यांसाठी बंपर 'सेव्हरन्स पॅकेज'कर्मचाऱ्यांना अचानक काढल्यामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी कंपनीने एक मजबूत आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. प्रभावित कर्मचाऱ्यांना २० आठवड्यांचे पगार आणि प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी अतिरिक्त एक आठवड्याचा पगार दिला जाईल. सहा महिन्यांपर्यंत आरोग्य विमा सुविधा आणि मे महिन्यापर्यंतची वेस्टेड इक्विटी दिली जाईल. ट्रान्झिशनसाठी ५,००० डॉलर्सची (सुमारे ४ लाख रुपये) रोख मदत आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे कॉर्पोरेट लॅपटॉप/मोबाईल स्वतःकडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Web Summary : Block, led by Jack Dorsey, will lay off 40% of its workforce (4000 employees) due to AI advancements, despite company profits. Impacted employees will receive severance packages, including twenty weeks' pay, healthcare, and transition assistance.
Web Summary : जैक डोर्सी के नेतृत्व वाली ब्लॉक कंपनी मुनाफे में होने के बावजूद AI के कारण 40% कर्मचारियों (4000) की छंटनी करेगी। प्रभावित कर्मचारियों को बीस सप्ताह का वेतन, स्वास्थ्य सेवा और सहायता पैकेज मिलेगा।