Join us  

याला म्हणतात लॉटरी! 30 रुपयांवरून थेट 24,000 वर पोहोचला 'हा' शेअर, 1 लाखाचे झाले 8 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 1:33 PM

4 एप्रिल 2022 रोजी हा शेअर NSE वर 24,650 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 81,209 टक्के एवढा परतावा दिला आहे...

एका सिमेंट स्टॉकने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर श्री सिमेंटचा (Shree Cement) आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 81,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. एकेकाळी या कंपनीचा शेअर 30.30 रुपयांवर होता. आता तो तब्बल 24,000 रुपयांच्याही पुढे गेले आहेत. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील हाय लेव्हल 32,048 रुपये एवढा आहे. तर लो-लेवल 21,650 रुपये एवढा आहे. 

1 लाखाचे झाले 8 कोटी रुपयांहून अधिक - श्री सीमेंटचा (Shree Cement) शेअर 6 जुलाई 2001 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) 30.30 रुपयांना होता. 4 एप्रिल 2022 रोजी हा शेअर NSE वर 24,650 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 81,209 टक्के एवढा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुतंवणूकदाराने 6 जुलै 2001 रोजी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असेल, तर आज त्याचे 8.1 कोटी रुपयांपेक्षाही अधिक झाले असतील.

14 वर्षांपेक्षाही कमी काळात 1 लाख रुपयांचे झाले 70 लाख रुपये-श्री सीमेंटचे शेअर्स 5 डिसेंबर 2008 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 349.20 रुपयांवर होता. तर 4 एप्रिल 2022 ला एनएसईवर 24,650 रुपयांवर पोहोचला आहे. एखाद्या व्यक्तीने 5 डिसेंबर 2008 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज याचे 70.58 लाख रुपयांच्या जवळपास पोहोचले असते. अर्थात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 69 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळाला असता. श्री सिमेंटचे मार्केट कॅप 88,70 कोटी रुपये आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक