Join us

बँका सावरण्यासाठी लागणार तीन वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 02:04 IST

एस अ‍ॅण्ड पीने जारी केलेल्या ‘ग्लोबल बँकिंग : रिकव्हरी विल स्ट्रेच टू २०२३ अँड बेयाँड’ नावाच्या अहवालात म्हटले आहे की, अशीच स्थिती मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका या उगवत्या बाजारांची आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९मधून सुधारण्यासाठी सर्वाधिक काळ लागू शकणाऱ्या व्यवस्थांमध्ये भारतीय बँकिंग व्यवस्थेचा समावेश असल्याचे जागतिक मानक संस्था ‘एस अ‍ॅण्ड पी’ने म्हटले आहे. २०१९च्या पातळीवर पोहोचायला भारतीय बँका आणि वित्तीय संस्था यांना आणखी तीन वर्षे लागतील, असे एस अ‍ॅण्ड पीने म्हटले आहे.

एस अ‍ॅण्ड पीने जारी केलेल्या ‘ग्लोबल बँकिंग : रिकव्हरी विल स्ट्रेच टू २०२३ अँड बेयाँड’ नावाच्या अहवालात म्हटले आहे की, अशीच स्थिती मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका या उगवत्या बाजारांची आहे. चीन, कॅनडा, सिंगापूर, हाँगकाँग, दक्षिण कोरिया आणि सौदी अरेबिया या देशातील बँकिंग व्यवस्था सर्वांत आधी २०२२च्या अखेरपर्यंत सुधारतील.

टॅग्स :व्यवसाय