Join us

पुन्हा डिविडेंड देणार 'ही' दिग्गज टेक कंपनी, १४ वेळा दिलाय बोनस शेअर; तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:13 IST

Wipro Dividend Stock: आयटी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीनं २५ पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. तर दुसरीकडे १० पेक्षा जास्त वेळा कंपनीनं बोनस शेअर्सही दिलेत.

Wipro Dividend Stock: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रो लिमिटेडनं २५ पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा लाभांश जाहीर केलाय. याची रेकॉर्ड डेट आज म्हणजे २८ जानेवारी २०२५ आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस किती आहे?

१ शेअरवर ६ रुपयांचा फायदा

एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीनं शेअर बाजारांना सांगितलं की, १ शेअरवर ६ रुपये लाभांश दिला जाईल. कंपनीनं या लाभांशासाठी २८ जानेवारी २०२५ ही विक्रमी तारीख निश्चित केली आहे. कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना १५ फेब्रुवारी किंवा त्यापूर्वी लाभांश दिला आहे. कंपनीने २५ पेक्षा जास्त वेळा लाभांश दिलाय.

१४ वेळा बोनस शेअर्स

आयटी कंपनीनं १९७१, १९८१, १९८५, १९८९, १९९२, १९९७, २००४, २००५, २०१०, २०१७, २०१९ आणि २०२४ मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते. २०१० मध्ये कंपनीने ३ शेअर्ससाठी २ शेअर्स दिले, २०१७ मध्ये कंपनीनं १ शेअरसाठी १ शेअर दिला, २०१९ मध्ये कंपनीनं ३ शेअर्ससाठी १ शेअर दिला आणि २०२४ मध्ये कंपनीनं १ शेअरसाठी १ शेअर बोनस दिला.

तज्ज्ञांचं मत काय?

विप्रोच्या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, सिस्टेमॅटिक्स इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं या महिन्याच्या सुरुवातीला कंपनीची टार्गेट प्राइस २२० रुपये प्रति शेअर केली आहे. ब्रोकरेज हाऊसनं 'सेल' याला टॅग दिलाय. एलारा सिक्युरिटीजने २५० रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवलं आहे. तर जेएम फायनान्शियलने ३६० रुपयांचं टार्गेट प्राईज दिलंय.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :विप्रोगुंतवणूक