Join us

ईशा अंबानी आणि आलिया भट्टमध्ये मोठा करार; पाहा काय आहे प्रकरण..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 20:58 IST

आलियाने इशासोबतचा फोटो शेअर करत या डीलची माहिती दिली.

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) यांच्यात मोठा करार झाला आहे. रिलायन्स रिटेलने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स रिटेलने आलियाच्या क्लोदिंग ब्रँड एड-ए-मम्मामध्ये  (Ed-a-Mamma) 51 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. किती कोटी रुपयांचा हा करार झाला आहे, याचा खुलासा झालेला नाही.

आलियाच्या कंपनीत 51% डीलरिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RVVL) च्या वतीने असे सांगण्यात आले की, आलिया भट्टचा एड-ए-मम्मा ब्रँड आणि RVVL ने जॉईंट व्हेंचरवर स्वाक्षरी केली आहे. याअंतर्गत आलियाच्या कंपनीतील 51 टक्के स्टेक खरेदी करण्यात आला आहे. आलिया भट्टने 2020 मध्ये लॉन्च केलेली कंपनी प्रामुख्याने चिल्ड्रन्स वेअर, टीन्स वेअर आणि मॅटर्निटी वेअर बनवते. आता रिलायन्स हा व्यवसाय पुढे नेणार आहे. एड-ए-मम्माचे मूल्य सुमारे 150 कोटी रुपये आहे. 

आलियाने ईशासोबतचा फोटो शेअर केला या कराराची घोषणा करताना आलिया भट्टने ईशा अंबानीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने एक लांबलचक पोस्ट शेअर करत या कराराची माहिती दिली. आलियाच्या कंपनीच्या उत्पादनांची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाइन केली जाते.

टॅग्स :आलिया भटईशा अंबानीव्यवसायगुंतवणूक