Join us  

लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 4:25 AM

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले.

- संजय खांडेकरअकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले. या उलाढालीचा फटका देशभरातील लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. सहा हजार रुपये क्विंटलने विकले जाणारे लोखंड आता चक्क ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहे.इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर भारतातील आर्थिक नाडी मोठ्या प्रमाणात चालते. इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी कायम असते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. देश आणि विदेशातील स्क्रप खरेदी करून ते वितळवून वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडाची निर्मिती केली जाते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर आणि मागणीवर अवलंबून असते. गत काही महिन्यांपासून बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे लोखंडाला मागणी नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त आणि विपुल स्कॅ्रप दाखल झाले. एकीकडे देशांंतर्गत स्कॅ्रपचे दर २,५०० रुपये क्विंटल असताना, विदेशातील स्क्रॅप केवळ १,५०० रुपये क्विंटल स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीज गडगडली आहे. 

टॅग्स :भारतव्यवसाय