Join us  

₹134 वर जाणार हा ₹64 वाला शेअर, कंपनीकडे ₹36185 कोटींच्या ऑर्डर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2024 6:17 PM

IRB Infrastructure Developers share: ₹134 वर जाणार हा ₹64 वाला शेअर, कंपनीकडे ₹36185 कोटींच्या ऑर्डर्स...

IRB Infrastructure Developers share: शेअर बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मोठी विक्री पाहायला मिळाली, ज्यामुळे IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सच्या शेअर्समध्ये प्रचंड अस्थिरता जणवली. व्यवहारादरम्यान या शेअरची किंमत 68.34 रुपयांवर पोहोचली. पण, काही काळानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर रेड झोनमध्ये गेला. या शेअरमधील हालचालीचे कारण म्हणजे, कंपनीने आपल्या सहयोगी आयआरबी इंफ्रास्ट्रक्चर ट्रस्ट (इनविट) सोबत एप्रिल 2024 मध्ये टोलवसुलीत 29% वाढ नोंदवली. 

कंपनीने स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले की, दोन्ही कंपन्यांनी मिळून एप्रिल महिन्यात ₹503 कोटींची टोलवसुली नोंदवली, जी एप्रिल 2023 मध्ये ₹388 कोटी होती. मागील वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये टोलवसुलीत 24% वाढ झाली आहे. ₹36,185 कोटींच्या ऑर्डर बुकमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये दोन नवीन टोल-ऑपरेट-हस्तांतरण मालमत्ता जोडल्यानंतर IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सकडे आता पुढील दोन वर्षांसाठी सुमारे ₹10,000 कोटींची ऑर्डर बुक असेल.

यामध्ये ₹7000 कोटींच्या इंजीनिअरींग, खरेदी आणि निर्माण ऑर्डर बुकचा समावेश आहे. डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीची एकूण ऑर्डर बुक ₹36,185 कोटी होती. विशेष म्हणजे, IRB ची 12 राज्यांमध्ये सुमारे ₹80,000 कोटींची मालमत्ता आहे. अलीकडे व्हेंचुरा सिक्युरिटीजने IRB इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्ससाठी टार्गेट निश्चित केले आहे. व्हेंचुराच्या मते पुढील 24 महिन्यांत हा शेअर 134 रुपये प्रति शेअरचा स्तर गाठू शकतो. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकशेअर बाजार