Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांचे ‘बेहाल’; बाजारात २३ दिवसांमध्ये ३० लाख काेटींचे नुकसान; अस्थिरतेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 12:28 IST

जागतिक परिस्थितीने बाजारावर मंदीची काळी छाया; ट्रम्प यांच्या रोजच्या नव्या घोषणांमुळे गोंधळाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय शेअर बाजारासाठी हा महिना अत्यंत निराशेचा ठरला आहे. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी या महिन्यांत मोठी घसरण नोंदवली आहे. विशेष म्हणजे, केवळ मुख्य निर्देशांकच नव्हे, तर  मिडकॅप आणि स्मॉलकॅप गेल्या चार महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण नोंदवली गेली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एका महिन्यात तब्बल ३० लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शु्क्रवारही बाजारासाठी ब्लॅक फ्रायडे ठरला असून, सेन्सेक्सच्या ७७० अंकांच्या मोठ्या पडझडीमुळे एकाच दिवसांत गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या एका महिन्यांत शेअर बाजार ५ टक्क्यांनी कोसळला असून, सेन्सेक्स तब्बल ३ हजार ९५७ अंकांनी खाली आला आहे. तर निफ्टीही १,१०६ अंकांनी घसरून २५,०४८ वर आला आहे. २ जानेवारी रोजी शेअर बाजाराचे भांडवल ४८,२०१,७१५.६७ कोटी रुपये इतके होते. २३ जानेवारी रोजी ते ४५,१४२,५५२.३० कोटी रुपयांवर आले आहे. त्यात एकूण घसरण तब्बल ३०,५९,१६३ कोटी रुपये इतकी झाली. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलातून एका आठवड्यात १५ लाख कोटी रुपयांहून अधिक संपत्ती स्वाहा झाली आहे. 

घसरणीची मुख्य कारणे कोणती?

  • रुपयाची ऐतिहासिक घसरण : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९२.०० हा नीचांकी स्तर गाठला. विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चिंतेत.
  • विदेशी गुंतवणूकदारांची पाठ : भारतीय बाजारातून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवल काढण्याची प्रक्रिया सुरूच ठेवली आहे.
  • कच्च्या तेलाचे वाढते दर : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ६४.७२ डॉलरवर पोहोचल्याने महागाईच्या चिंतेने बाजारावर दबाव.

एका महिन्यात घसरण?

  • सेन्सेक्स     ४.६३%
  • निफ्टी ५०     ४.२३%
  • मिडकॅप     ६.१९%
  • निफ्टी स्मॉलकॅप     ७.४१%
  • निफ्टी रिअल्टी     १४.४१%
  • निफ्टी बँक     १.३९%

घसरणीचा मोठा फटका टॉप १० कंपन्यांनाही बसला आहे. त्यांच्या बाजार भांडवलात ५६१,२०६ कोटी रुपयांनी घसरण झाली आहे.

सोनं-चांदी पुन्हा तेजीत; गाठले नवे उच्चांक

दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावात १५०० रुपयांची वाढ होऊन ते १,५८,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. चांदीने तब्बल ९,५०० रुपयांची मोठी उडी घेत ३,२९,५०० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Investors Bleed: Market Crash Erases ₹30 Lakh Crore in Losses

Web Summary : Indian stock markets witnessed a sharp decline, erasing ₹30 lakh crore in investor wealth in 23 days. Factors include a weakening rupee, foreign investor pullout, and rising crude oil prices. Gold and silver prices surged to new highs.
टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पव्यवसायगुंतवणूक