Join us

आठवडाभर गुंतवणूकदारांच्या सावध हाका; भारत-अमेरिका व्यापार, कंपन्यांचे तिमाही निकाल

By प्रसाद गो.जोशी | Updated: July 28, 2025 09:12 IST

व्याजदर कायम राहतील, असा अंदाज आहे.

प्रसाद गो. जोशी

भारत आणि अमेरिका यांच्यात होणार असलेला व्यापारी करार, परकीय वित्तसंस्थांची भूमिका आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची होत असलेली बैठक याबरोबरच महिना अखेरीमुळे होणार असलेली सौदापूर्ती यामुळे गुंतवणूकदार आगामी सप्ताहात सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजार पाचव्या आठवड्यात खाली जाण्याची शक्यता दिसत आहे. 

लवकरच भारत-अमेरिकेतील व्यापार करार होण्याची बाजाराला अपेक्षा आहे. महिनाअखेरीस अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची बैठक होत असून, त्यामध्ये व्याजदराबाबत निर्णय होणार आहे.  व्याजदर कायम राहतील, असा अंदाज आहे.

सध्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होत असून ते बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी लागत असल्याने बाजाराला वाढीची शक्यता दिसत नाही. त्यातच या सप्ताहात जुलै महिन्याची सौदापूर्ती होत असल्याने बाजारावर विक्रीचे दडपण राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार