- - पी. व्ही. सुब्रमण्यम(आर्थिक सल्लागार)घरांबद्दलच्या काय काय चुकीच्या कल्पना आपल्या डोक्यात बसलेल्या असतात?..१ - घरं घेणं ही एक अतिशय उत्तम गुंतवणूक आहे.२ - महागाई सतत वाढत असताना ईएमआयमुळे महागाईची झळ जाणवत नाही.३ - रिअल इ्स्टेटच्या किमती कधीच कमी होत नाहीत.४ - बदली किंवा काही कारणामुळे तुम्हाला घर सोडायचं असलं, तरी केव्हाही तुम्हाला ते भाड्यानं देता येऊ शकतं.५ - घरभाडं देत राहिल्यानं तुमचा पैसा वाया जातो, ईएमआयमुळे मात्र घर तुमच्या मालकीचं होतं.पण आपल्या डाेक्यात असलेल्या या संकल्पना खरोखरच बरोबर आहेत? काहींचा विचार करू...१ - घर घेणं ही उत्तम गुंतवणूक असल्याचं म्हटलं जातं. समजा तुम्ही एक कोटीचं घर विकत घेतलं, त्यासाठी प्राथमिक रक्कम म्हणून दहा लाख रुपये भरले आणि ९० लाखाचं कर्ज काढलं. त्यात ब्रोकरेज फी, रजिस्ट्रेशन फी, घराचं फर्निशिंग, मेंटेनन्स इत्यादी खर्च मिळवा. गणित मांडा. तुम्हाला लक्षात येईल, हा नफा एक आकडी संख्येपेक्षा मोठ्या टक्क्याचा नसेल.२ - घर आपल्याला केव्हाही भाड्यानं देता येतं, असं म्हटलं जातं. पण बऱ्याचदा भाडंच चांगलं मिळत नाही, कधी भाडेकरु चांगला मिळत नाही, तर कधी वेळेवर भाडेकरू मिळेल, याचीही गॅरंटी नाही. घर विकायचं असेल तेव्हाही मनाजोगतं गिऱ्हाईक मिळेलच, असं नाही. भारतीय संदर्भात विचार केला, तर जेवढा ईएमआय आपण भरतो त्यापेक्षा कितीतरी कमीच भाडं मिळतं. ३ - घर विकत घेण्यापेक्षा भाडं भरत राहणं हा पैशांचा अपव्यय आहे, असं अनेकांना वाटतं, पण प्रत्यक्षात काय आहे? समजा, मुंबईत तुम्ही अडीच कोटी रुपयांचं घर विकत घेतलं, त्यासाठीचा ईएमआय साधारण दोन लाख २५ हजार रुपये असेल. तेच किंवा तशाच प्रकारचं घर तुम्ही भाड्यानं घेतलं, तर साधारण फक्त ३० हजार रुपये भाडं द्यावं लागेल. भाड्यासाठी आपण अंदाजे वार्षिक दोन टक्के रक्कम देतो, ईएमआयसाठी मात्र सुमारे ११ टक्के रक्कम मोजावी लागते.४ - घरमालकानं तातडीने घर खाली करायला सांगणं हे फक्त चित्रपटातच घडतं. प्रत्यक्षात चांगला भाडेकरु मिळण्याची चिंता घरमालकाला खूपच जास्त असते.- तेव्हा ठरवा आता, काय जास्त बरोबर?
Investment: घर विकत घ्याल की भाड्यानं राहाल? फायदेशीर मार्ग कुठला, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 5:44 AM