Join us

‘जेट’प्रकरणी हस्तक्षेप करा; शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 06:01 IST

जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने कंपनीच्या २० हजार कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाल्याने कंपनीच्या २० हजार कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी व कंपनी पुन्हा सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहून केली आहे.आॅल इंडिया जेट एअरवेज आॅफिसर्स अँड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष आमदार किरण पावसकर यांनी याबाबत पवार यांना पत्र लिहून व त्यांची भेट घेऊन याबाबत पं्रतप्रधानांचे लक्ष वेधण्याची मागणी केली होती. जेट एअरवेजच्या बोली प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनी पुन्हा सुरू होण्याबाबत कर्मचाºयांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे. वेतन रखडलेले असल्याने कर्मचाºयांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. कर्मचाºयांना दुसºया कंपनीमध्ये रोजगारांची संधी अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे, शिवाय जेटच्या तुलनेत इतर कंपन्या कमी वेतन देत असल्याचे समोर आले आहे. या कर्मचाºयांचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी व इतर रकमा कंपनीमध्ये अडकल्या आहेत. कंपनीचे कामकाज पुन्हा सुरू नझाल्याने या कर्मचाºयांची आर्थिक ओढाताण होऊ लागली आहे.सरकारने या प्रकरणी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे मत कर्मचाºयांमधून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांचे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी पवारांना विनंती करण्यात आली होती, पवारांनी याबाबत मोदींना पत्र लिहिले असून, पुढील कार्यवाहीला प्रारंभ होण्याची आशा आहे, असे पावसकर म्हणाले.

टॅग्स :जेट एअरवेजव्यवसायशरद पवार