Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 07:50 IST

वित्त मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी जुनेच व्याजदर लागू राहतील. 

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि सुकन्या समृद्धी यांसारख्या लोकप्रिय अल्प बचत योजनांच्या व्याजदरात चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी (जानेवारी ते मार्च २०२६) कोणताही बदल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे, सलग सातव्या तिमाहीत हे व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत.वित्त मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, १ जानेवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी जुनेच व्याजदर लागू राहतील. 

प्रमुख योजनांचे व्याजदर - योजना         व्याजदर सुकन्या समृद्धी योजना         ८.२%राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र     ७.७%किसान विकास पत्र     ७.५%मासिक उत्पन्न योजना     ७.४%पीपीएफ     ७.१%३ वर्षांची मुदत ठेव     ७.१%बचत खाते     ४.०%

English
हिंदी सारांश
Web Title : Small Savings Schemes Interest Rates Unchanged for Seventh Consecutive Quarter

Web Summary : Government keeps interest rates on small savings schemes, including PPF and Sukanya Samriddhi, unchanged for the seventh straight quarter. The rates will remain the same for the January-March 2026 quarter, according to a Finance Ministry notification.
टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र