Join us  

पायाभूत उद्योगांमध्ये सलग सातव्या महिन्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 3:16 AM

industry News : देशातील आठ प्रमुख पायाभूत उद्योगांमधील उत्पादनातील घसरण सलग सातव्या महिन्यामध्ये कायम होती. सप्टेंबर महिन्यामध्ये हे उत्पादन ०.८ टक्क्यांनी घटले आहे.

नवी दिल्ली : देशातील आठ प्रमुख पायाभूत उद्योगांमधील उत्पादनातील घसरण सलग सातव्या महिन्यामध्ये कायम होती. सप्टेंबर महिन्यामध्ये हे उत्पादन ०.८ टक्क्यांनी घटले आहे. मात्र मार्च महिन्यापासून होत असलेल्या घसरणीमध्ये ही सर्वात कमी घट आहे, हीच समाधानाची बाब होय. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये देशातील आठ पायाभूत उद्योगांचे उत्पादन वाषिर्क आधारावर ०.८ टक्क्यांनी घटले आहे. खनिज तेल, गॅस आणि सीमेंट या क्षेत्रांची कामगिरी सर्वात खराब झाली. कोळसा, वीज आणि पोलाद या क्षेत्रांची कामगिरी चांगली झाली आहे. मागील वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये आठ पायाभूत उद्योगांमध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाली होती.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतअर्थव्यवस्था