Infosys Hiring: देशातील दिग्गज सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसने सर्व तर्कवितर्क बाजूला सारत फ्रेशर्सना मोठ्या पगाराची ऑफर दिली आहे. कंपनीची 'ऑफ-कॅम्पस' भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, यामध्ये तरुणांना भरघोस पगारासोबतच जॉइनिंग बोनसही देऊ केलाय. या भरतीमध्ये पूर्णपणे फ्रेशर्स असलेल्यांसह एक वर्षाचा अनुभव असलेल्या तरुणांनाही संधी देण्यात आली आहे.
इन्फोसिसने या भरती प्रक्रियेत तीन वेगवेगळ्या स्तरांसाठी आकर्षक पॅकेज दिले आहेत:
लेव्हल ३: वार्षिक २१ लाख रुपयांचं पॅकेज.
लेव्हल २: वार्षिक १६ लाख रुपयांचं पॅकेज.
लेव्हल १: वार्षिक १० लाख रुपयांचं पॅकेज.
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या अटी
कंपनीच्या अंतर्गत ईमेलनुसार, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या शाखांमधील BE, B.Tech, ME, M.Tech, MCA आणि M.Sc पदवीधारकांची निवड करण्यात आली आहे. २०२४ मध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार यासाठी पात्र ठरले असून, त्यांच्याकडे १२ महिन्यांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
'या' विशेष भूमिकांसाठी झाली भरती
यावेळी इन्फोसिसनं प्रामुख्यानं क्लाउड, सायबर सिक्युरिटी, डेटा इंजिनिअरिंग आणि एआय (AI) यांसारख्या तांत्रिक भूमिकांसाठी भरती केली आहे. या भूमिकांसाठी निवड झालेल्यांना २० ते ४० टक्क्यांपर्यंत अधिक पगार दिला आहे. तसंच, फ्रेशर्सच्या वार्षिक पॅकेजमध्येही ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, इन्फोसिसने इतिहासात पहिल्यांदाच इतकं मोठे पॅकेज आणि पगारात भरघोस वाढ देऊ केली आहे.
Web Summary : Infosys offers freshers packages up to ₹21 lakhs with bonuses. BE, B.Tech, ME, M.Tech, MCA, M.Sc graduates in computer science and related fields are eligible. Roles are primarily for cloud, cybersecurity, data engineering, and AI.
Web Summary : इंफोसिस फ्रेशर्स को बोनस के साथ ₹21 लाख तक का पैकेज दे रही है। कंप्यूटर साइंस और संबंधित क्षेत्रों में बीई, बी.टेक, एमई, एम.टेक, एमसीए, एम.एससी स्नातक पात्र हैं। भूमिकाएँ मुख्य रूप से क्लाउड, साइबर सुरक्षा, डेटा इंजीनियरिंग और एआई के लिए हैं।