भारतातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने आर्थिक वर्ष २०२६ संपण्यापूर्वी एक मोठी व्यावसायिक खेळी केली आहे. कंपनीने अमेरिकेतील 'ऑप्टिमम हेल्थकेयर आयटी' आणि 'स्ट्रॅटस' या दोन कंपन्यांच्या खरेदीसाठी निश्चित करार केले आहेत. हे दोन्ही व्यवहार 'ऑल-कॅश' (रोख रक्कम) स्वरूपात होणार आहेत.
'ऑप्टिमम हेल्थकेयर आयटी' ही कंपनी प्रामुख्याने रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणांना 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन' आणि 'कन्सल्टिंग' सेवा पुरवते. फ्लोरिडास्थित या कंपनीच्या खरेदीमुळे इन्फोसिसला अमेरिकन आरोग्य सेवा क्षेत्रात मोठी बाजारपेठ मिळणार आहे. ऑप्टिममचे १६०० हून अधिक तज्ज्ञ आता इन्फोसिसच्या टीमचा भाग होतील. या कंपनीचा महसूल २०२५ मध्ये २७५.९ दशलक्ष डॉलर्स इतका होता. या कंपनीसाठी इन्फीने ४६५ दशलक्ष डॉलर्स मोजले आहेत. तर
'स्ट्रॅटस' या कंपनीसाठी ९५ दशलक्ष डॉलर्स मोजले आहेत. न्यू जर्सीमधील ही कंपनी 'प्रॉपर्टी आणि कॅज्युअल्टी' विमा क्षेत्रातील तंत्रज्ञान उपायांमध्ये माहिर आहे. 'गाईडवायर' सारख्या क्लाउड-बेस्ड सॉफ्टवेअरच्या अंमलबजावणीत ही कंपनी आघाडीवर आहे. यामुळे इन्फोसिसचा विमा पोर्टफोलिओ अधिक मजबूत होईल. यामध्ये ४५० हून अधिक तज्ज्ञांचा समावेश आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय?इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्या मते, या अधिग्रहणामुळे इन्फोसिसच्या 'टोपाज' आणि 'कोबाल्ट' प्लॅटफॉर्मला नवीन ताकद मिळेल. हे दोन्ही व्यवहार २०२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून २०२६) पूर्ण होण्याची शक्यता आहे. या बातमीनंतर इन्फोसिसच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे बारीक लक्ष आहे.
Web Summary : Infosys strengthens its US presence, acquiring Optimum Healthcare IT and Stratus for $560 million. The acquisitions boost Infosys' healthcare and insurance capabilities, adding expertise and enhancing its platforms. Deals expected to close by Q1 2027.
Web Summary : इन्फोसिस ने 560 मिलियन डॉलर में ऑप्टिमम हेल्थकेयर आईटी और स्ट्रैटस का अधिग्रहण किया। इससे इन्फोसिस की स्वास्थ्य सेवा और बीमा क्षमताओं को बढ़ावा मिलेगा। सौदे 2027 की पहली तिमाही तक पूरे होने की उम्मीद है।