Join us  

Infosys चे सह-संस्थापक शिबुलाल यांनी खरेदी केले कंपनीचे १०० कोटी रूपयांचे शेअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 3:17 PM

Infosys Co-Founder buys Share : १०० कोटी रूपयांमध्ये शिबुलाल यांनी केले कंपनीचे ७.४५ लाख शेअर्सच खरेदी

ठळक मुद्दे१०० कोटी रूपयांमध्ये कंपनीनं केले कंपनीचे ७.४५ लाख शेअर्सच खरेदी१३४२.०५ रूपये प्रति शेअर दरानं खरेदी केले शेअर.

Infosys Co-Founder buys Share : इन्फोसिसचे सह-संस्थापक शिबुलाल यांनी सोमावीर खुल्या बाजाराात कंपनीच्या १०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. BSE ब्लॉक डील डेटानुसार शिबुलाल यांनी १,३४२.०५ रूपये प्रति शेअर्सच्या दरानं एकूण १०० कोटी रूपयांच्या ७.४५ लाख शेअर्सची खरेदी केली. मार्च तिमाहीच्या अखेरिस Infosys मध्ये शिबुलाल यांचं होल्डिंग ०.०५ टक्के होतं. एका दुसऱ्या व्यवहारात शिबुलाल यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी सोमवारी १,३४२.०२ प्रति शेअर दरानं इन्फोसिसच्या ७.४५ लाख शेअर्सची विक्री केली. मार्च तिमाहीमध्ये आकडेवारीनुसार Infosys च्या प्रमोटर कुमारी यांच्याकडे ०.२१ टक्के शेअर्सचं होल्डिंग आहे.यापूर्वी शिबुलाल यांनी खुल्या बाजारात १२ मे आणि १९ मे रोजी इन्फोसिसचे १००-१०० कोटी रूपयांचे शेअर्स खरेदी केले होते. परंतु याचवेळी शिबुलाल यांच्या पत्नी कुमारी शिबुलाल यांनी एवढ्याच शेअर्सची विक्री केली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी इन्फोसिसनं १४ एप्रिल रोजी तिमाहीची आकडेवारी जाहीर केली होती. या तिमाहीत कंपनीचं कन्सोलिडेटेड नेट प्रॉफिट २.६ टक्क्यांनी घसरून ५०७८ कोटी रूपये होतं. कंपनीच्या अंदाजानुसार ही कमी होती.  तिमाही दर तिमाही आधारावर इन्फोसिसच्या कन्सोलिडेटेड कमाई २.८ टक्क्यांनी वाढवून २६,३११ कोटी रूपये राहिली होती. बाजारातील एका जाणकाराच्या मते हेदेखील अंदाजापेक्षा कमी होते. जाणकार २६,७०१.८ कोटी रूपये कन्सोलिडेटेड कमाईचा अंदाज वर्तवला होता.

टॅग्स :व्यवसायइन्फोसिसशेअर बाजारबाजार