Join us

Inflation:आता तूरडाळही रडवणार; किमती ­­४०% वाढल्या, सरकार खरेदी करणार, भाववाढ रोखणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 09:53 IST

Inflation: किरकोळ बाजारात तूरडाळीची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे महाग झालेली तूरडाळ आता सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहे. भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत. 

नवी दिल्ली - किरकोळ बाजारात तूरडाळीची किंमत मागील वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे महाग झालेली तूरडाळ आता सर्वसामान्यांना रडवण्याच्या तयारीत आहे. भाववाढ रोखण्यासाठी केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत. 

मागच्या वर्षी तूरडाळीची किंमत ११२ रुपये प्रतिकिलो इतकी होती. ती यंदा १५८ रुपयांपर्यंत वाढली आहे. वार्षिक आधारे डाळींचा महागाई दर १८.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. या भाववाढीमुळे तूरडाळीची साठेबाजी, तसेच चढ्या भावाने विक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकार यंदा शेतकऱ्यांकडून ८ ते १० लाख टनांची तूरडाळ खरेदी करण्याच्या तयारीत आहे. (वृत्तसंस्था) 

कोण करणार खरेदी? तूरडाळीची खरेदी बाजारभावानुसार किंमत स्थिरीकरण निधीतून केली जाणार आहे. नॅशनल ॲग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनसीसीएफ) यांच्याकडून तूरडाळीची खरेदी केली जाणार आहे. या संस्था थेट शेतकऱ्यांकडून तूरडाळीची खरेदी करणार आहेत.

टॅग्स :महागाई