Join us

अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 07:39 IST

वाढीव शुल्काचा भार शेवटी ग्राहकांवर पडणार आहे. कारण, भारतीय वस्तू आयात करणारे अमेरिकन व्यापारी टॅरिफचा खर्च ग्राहकांकडून वसूल करतील. त्यामुळे, भारतीय उत्पादनांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन खरेदीदारांना आता जास्त पैसे मोजावे लागतील किंवा कमी शुल्क असलेल्या इतर देशांच्या उत्पादनांकडे वळावे लागेल.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५०% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील ग्राहकांना भोगावा लागणार आहे. या अतिरिक्त टॅरिफमुळे भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यामुळे अमेरिकेतील महागाई वाढण्याची शक्यता आहे. या आधी जाहीर केलेला २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू झाला आहे, तर आणखी २५% टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

वाढीव शुल्काचा भार शेवटी ग्राहकांवर पडणार आहे. कारण, भारतीय वस्तू आयात करणारे अमेरिकन व्यापारी टॅरिफचा खर्च ग्राहकांकडून वसूल करतील. त्यामुळे, भारतीय उत्पादनांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन खरेदीदारांना आता जास्त पैसे मोजावे लागतील किंवा कमी शुल्क असलेल्या इतर देशांच्या उत्पादनांकडे वळावे लागेल. या निर्णयामुळे अमेरिकेतील स्थानिक बाजारपेठेत किमती वाढून महागाईचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार वाढ६४% टॅरिफ भारतीय कापडावर लागू झाल्याने शर्ट, पॅन्ट, ड्रेस खूप महाग होतील.५२.१% टॅरिफमुळे सोने, हिरे, दागिन्यांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढतील.५२.३% इतक्या टॅरिफमुळे फर्निचर खरेदी करणे महाग होईल.५१.३%  टॅरिफमुळे अमेरिकेतील उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या यंत्रसामग्रीची किंमत वाढेल.

भारत-अमेरिका व्यापार१३१.८ अब्ज डॉलर्स - २०२४-२५ मधील भारत-अमेरिका एकूण व्यापार ४५.३ अब्ज डॉलर्स - भारताची अमेरिकेकडून आयात८६.५ अब्ज डॉलर्स - भारताची अमेरिकेला निर्यात

पर्यायांचा शोधअमेरिकेने लावलेल्या टॅरिफच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारत सज्ज आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. डम्मू रवी यांनी सांगितले. हा निर्णय पूर्णपणे एकतर्फी आणि निराधार आहे, पण दोन्ही देशांमधील व्यापारी चर्चा अजूनही सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चर्चा तात्पुरती थांबली : ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यामुळे चर्चा तात्पुरती थांबली असली तरी, ती पुन्हा सुरू होईल, असे डॉ. रवी यांनी सांगितले. या निर्णयामुळे भारतीय उद्योगांचे मनोधैर्य कमी होणार नसून, ते आता मध्य-पूर्व, दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि दक्षिण आशिया अशा नव्या बाजारपेठांचा शोध घेतील. डॉ. रवी यांनी ब्रिक्स देशांच्या ‘पर्यायी चलना’वरही भाष्य केले. अमेरिकन डॉलरला वगळण्याचा भारताचा कोणताही हेतू नसला तरी, द्विपक्षीय व्यापारासाठी स्थानिक चलनांचा वापर करण्यावर चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

टॅग्स :व्यवसायअमेरिकाअमेरिका