Join us

अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन; आकाश आणि श्लोका बनले आई-बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 18:47 IST

Akash-Shloka blessed baby girl : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

Akash- Shloka Baby Girl : जगातील नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश आणि सून श्लोका यांना मुलगी झाली आहे. श्लोकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे.  

मुकेश अंबानींची मोठी सून श्लोका हिने आज म्हणजेच ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला आहे. खरं तर श्लोका आणि आकाश १० डिसेंबर २०२० रोजी पहिल्यांदा पालक झाले होते. त्यामुळे आकाश आणि श्लोका हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. श्लोका आणि आकाश यांच्या मुलाचे नाव पृथ्वी असं आहे. त्यामुळे पृथ्वी आकाश अंबानीला आता त्याची धाकटी बहीण मिळाली आहे.

आकाश आणि श्लोकाची लव्हस्टोरी आकाश आणि श्लोका हे शालेय काळापासून एकमेकांना ओळखत होते. दोघेही बालपणीचे मित्र आहेत आणि दोघेही धीरूभाई अंबानी शाळेत शिकले आहेत. दोघांनी एकमेकांना खूप दिवस डेट केले होते आणि नंतर लग्न केले. त्यावेळी गोव्यात आकाशने श्लोकाला प्रपोज केल्याचे वृत्त समोर आले होते. श्लोकाचे संपूर्ण अंबानी कुटुंबाशी असलेले नाते खूपच सुंदर आहे. सासू नीता अंबानी यांनी देखील अनेकदा श्लोकाचे कौतुक केले होते.  

टॅग्स :मुकेश अंबानीनीता अंबानीआकाश अंबानीव्यवसाय