Join us

गतवर्षात इंडिगोच्या ताफ्यात ५८ विमाने,  बाजारपेठेतील हिस्सेदारी अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:18 IST

इंडिगोने २०२० या वर्षापासून प्रत्येक वर्षी नव्या विमानांच्या खरेदीवर जोर देत आपला विस्तार केला आहे.

मुंबई : देशातील अव्वल विमान कंपनी असा लौकिक अससेल्या इंडिगो कंपनीच्या ताफ्यात नुकत्याच सरलेल्या २०२४ या वर्षामध्ये ५८ नवीन विमाने दाखल झाली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व विमाने एअरबस कंपनीची आहेत. 

इंडिगोने २०२० या वर्षापासून प्रत्येक वर्षी नव्या विमानांच्या खरेदीवर जोर देत आपला विस्तार केला आहे. तसेच भारतीय बाजारपेठेतील आपली हिस्सेदारी अव्वल राखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०२० या वर्षामध्ये कंपनीने ४४, २०२१ साली ४२, २०२२ या वर्षी ४९, तर २०२३ या वर्षी ४१ विमानांची खरेदी केली आहे. येत्या दशकभराच्या कालावधीमध्ये एक हजार नव्या विमानांची खरेदी करण्याची घोषणा कंपनीने गेल्यावर्षी केली होती. त्या घोषणेनुसार आता टप्प्याटप्प्याने कंपनीच्या ताफ्यात नवीन विमाने दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :इंडिगोव्यवसाय