Join us

गो फर्स्ट खरेदी करण्यास इंडिगो उत्सुक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 10:20 IST

आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या गो फर्स्ट विमान कंपनी खरेदी करण्यास देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगो उत्सुक असल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या गो फर्स्ट विमान कंपनी खरेदी करण्यास देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी इंडिगो उत्सुक असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, याबाबतच्या चर्चांवर आम्ही अद्याप भाष्य करू शकत नसल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

गो फर्स्ट कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानंतर तिला आपल्या कंपनीत विलीन करून घेण्यास इंडिगो उत्सुक असल्याचे वृत्त पुढे आले होते. त्यासंदर्भात दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अनेक बैठका झाल्या. विलीनीकरणाच्या या प्रक्रियेस किमान पाच वर्षांचा कालावधी लागेल, असेही सांगितले जाते. दरम्यान, गो फर्स्टने १२ जूनपर्यंतच्या सर्वच तिकीट रद्द केले असून, लवकरच नव्याने सेवेत दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.

देशातील किफायतशीर विमान वाहतूक कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गो फर्स्टला विविध बँका, प्रवर्तक, गुंतवणूकदारांचे सुमारे ११,४६३ कोटी रुपये देणे आहे.

 

टॅग्स :इंडिगोगो-एअर