Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पंना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 10:48 IST

America Tariff : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादल्यानंतरही भारताच्या निर्यातीवर त्याचा परिणाम झालेला नाही.

America Tariff : अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क लादल्यानंतरही भारतीय निर्यातदारांनी जागतिक बाजारपेठेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. "व्यापार हा पाण्यासारखा असतो, तो आपला रस्ता स्वतः शोधतो," या उक्तीप्रमाणे भारतीय निर्यात क्षेत्राने अमेरिकन निर्बंध, लाल समुद्रातील संकट आणि रशिया-युक्रेन युद्धासारख्या आव्हानांवर मात करत २०२६ मध्येही दमदार प्रगतीचे संकेत दिले आहेत.

निर्यातीचा ऐतिहासिक टप्पावाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये भारताची वस्तू आणि सेवांची एकूण निर्यात ८२५.२५ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. यामध्ये वार्षिक आधारावर ६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ८ महिन्यांतच (एप्रिल-नोव्हेंबर २०२५) भारताने ५६२ अब्ज डॉलर्सची निर्यात साध्य केली आहे.

अमेरिकेला दिलेल्या निर्यातीत २२ टक्क्यांची वाढअमेरिकेने ५० टक्के टॅरिफ लागू केल्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात निर्यातीवर काहीसा परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर २०२५ मध्ये अमेरिकेला होणारी निर्यात २२.६१ टक्क्यांनी वाढून ६.९८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. भारतीय उत्पादनांची गुणवत्ता आणि बदललेली बाजारपेठ यामुळे हे यश मिळाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

२०२६ साठी निर्यातीचे 'बूस्टर डोस'येत्या २०२६ सालात भारतीय निर्यातीला अधिक वेग मिळण्याची तीन मुख्य कारणे आहेत.

  • नवे व्यापार करार : ब्रिटन, ओमान आणि न्यूझीलंडसोबतचे मुक्त व्यापार करार २०२६ मध्ये लागू होणार आहेत, ज्यामुळे भारतीय वस्तूंना परदेशी बाजारपेठ सहज उपलब्ध होईल.
  • इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात क्रांती : परकीय थेट गुंतवणुकीमुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत ३९ टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे.
  • विविधीकरण : केवळ अमेरिका किंवा युरोपवर अवलंबून न राहता भारतीय निर्यातदारांनी नवीन बाजारपेठा शोधल्या आहेत.

निर्यातीचा चढता आलेख (अब्ज डॉलर्समध्ये)

वर्ष निर्यात मूल्य (वस्तू) 
२०२० २७६.५ अब्ज डॉलर 
२०२१ ३९५.५ अब्ज डॉलर 
२०२२ ४५३.३ अब्ज डॉलर 
२०२४ ४४३ अब्ज डॉलर 
२०२४-२५ (एकूण) ८२५.२५ अब्ज डॉलर (वस्तू + सेवा) 

वाचा - संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?

आव्हाने आणि संधीजागतिक व्यापार संघटनेने २०२६ मध्ये जागतिक व्यापारात मोठी घट होऊन तो केवळ ०.५ टक्क्यांवर येण्याचा इशारा दिला आहे. विकसित देशांमधील मंदीचे हे संकेत असतानाही, भारताची अभियांत्रिकी उत्पादने, औषधे आणि वाहनांची निर्यात मात्र स्थिर गतीने वाढत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India's exports surge despite US tariffs, poised for 2026 growth.

Web Summary : Despite US tariffs, India's exports hit a record $825.25 billion in FY25. Growth is fueled by new trade deals, electronics sector boom and diversification. US exports increased by 22.61% in Nov 2025.
टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पअमेरिकाव्यवसाय