Join us

भारताची अर्थव्यवस्था राहील अव्वल स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 01:31 IST

आगामी दशकात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या काळात भारताचा वृद्धीदर ७.९ टक्के म्हणजेच चीन व अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली - आगामी दशकात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या काळात भारताचा वृद्धीदर ७.९ टक्के म्हणजेच चीन व अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे.हॉर्वर्ड विद्यापीठातील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ने (सीआयडी) गुरुवारी जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, आगामी दशकात भारत व व्हिएतनाम सर्वाधिक गतीने वाढतील. रसायन, वाहने व काही ठराविक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी क्षेत्रातील निर्यात वाढीत भारताने नवे मार्ग तयार केले आहेत. आगामी दशकात या क्षेत्रांचा वरचष्मा असेल. यात चांगले काम करणाºया अर्थव्यवस्था आघाडीवर राहतील.जटिलता संधी निर्देशांकातही (सीओआय) भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. अहवालात म्हटले आहे की, भारताने केवळ निर्यातीत वैविध्य मिळविण्यातच यश मिळविले नसून वैविध्यपूर्ण उत्पादने तयार करण्यासाठी कारखान्यांत सहजपणे फेरबदल होतील, अशी व्यवस्थाही उभी केली आहे. त्यामुळे भारतातील उत्पादन वैविध्य तुलनेने सुलभ आहे. सन २0१६ पर्यंत चीनचा वृद्धीदर ४.९ टक्के, अमेरिकेचा ३ टक्के आणि फ्रान्सचा ३.५ टक्के असेल, असे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थाभारतबाजारबातम्या