Join us  

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!, 'या' विशेष गाड्या लवकरच सुरू होणार, पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 4:08 PM

Indian Railways : प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा कालावधी वाढविला आहे.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन अहमदाबाद ते पुणे, भुज-पुणे आणि भगतची कोठी-पुणे दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

नवी दिल्ली : कोरोना संकट काळात प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय रेल्वेने एक पाऊल उचलले आहे. रेल्वेने अनेक गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधी वाढविला आहे, त्याचबरोबर काही साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचीही घोषणा केली आहे. रेल्वेच्या या निर्णयानंतर प्रवाशांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा कालावधी वाढविला आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ज्या गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात आली आहेत, अशा गाड्यांसाठी 23 जानेवारीपासून प्रवाशांना तिकिटांची बुकिंग करता येणार आहे.

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन अहमदाबाद ते पुणे, भुज-पुणे आणि भगतची कोठी-पुणे दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. याशिवाय, दररोज दिल्ली सराय रोहिल्ला-बिकानेर-दिल्ली सराय रोहिल्लावरही विशेष गाडी चालविली जात आहे.

या गाड्यांचा कालावधी वाढवलारेल्वेने वाढविलेल्या गाड्यांमध्ये हावडाहून धनबादमार्गे धावणारी बाडमेर विशेष रेल्वे, गोमोहून धावणारी भुवनेश्वर- आनंद विहार विशेष रेल्वेसह इतर गाड्यांचा समावेश आहे.

ट्रेन नंबर 09608 / 09607 : मदार-कोलकाता-मदार साप्ताहिक विशेष ट्रेन 1 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारीपर्यंत (दर सोमवारी) आणि कोलकाताहून 04 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत (दर गुरुवार) धावणार आहे.

ट्रेन नंबर 02323 / 02324: हावडा-बाडमेर-हावडा साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल विशेष गाड्यांचा ऑपरेटिंग कालावधी वाढविण्यात आला. उत्तर पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार, हावडा 29 जानेवारी 2021 ते 26 मार्च 2021, तर बाडमेरहून 3 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान धावणार आहे.

ट्रेन नंबर 02324: बाडमेर हावजा एक्सप्रेस - 3 फेब्रुवारी ते 31 मार्चपर्यंत धावणार आहे.ट्रेन नंबर 02819: भुवनेश्वर आनंदविहार एक्सप्रेस - 2 फेब्रुवारीपासून 21 मार्चपर्यंत धावणार आहे.ट्रेन नंबर 02820: आनंदविहार भुवनेश्वर एक्सप्रेस - 4 फेब्रुवारीपासून 2 एप्रिलपर्यंत धावणार आहे.ट्रेन नंबर 02331: हावडा जम्मूतवी हिमगिरी एक्सप्रेस 30 जानेवारीपासून 30 मार्चपर्यंत धावेल.ट्रेन नंबर 02332: जम्मूतवी हावडा हिमगिरी एक्सप्रेस - 1 फेब्रुवारीपासून 1 एप्रिलपर्यंत धावणार आहे.ट्रेन नंबर 03019: हावडा काठगोदाम बाघ एक्सप्रेस - 31 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत धावणार आहे.ट्रेन नंबर 03020: काठगोदाम हावडा बाघ एक्सप्रेस - 2 फेब्रुवारीपासून 2 एप्रिलपर्यंत धावणार आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेरेल्वे