Join us
Daily Top 2Weekly Top 5

तिकीटाची कटकट संपणार! रेल्वे आणतेय हायस्पीड बुकिंग सिस्टीम; एका मिनिटात १.५ लाख तिकीटे बुक होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 13:46 IST

Indian Railway: नवीन प्रणालीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

Indian Railway:भारतीय रेल्वे लवकरच तिकीट बुकिंग प्रणालीत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगदरम्यान वेबसाइट स्लो होणे, सर्व्हर डाऊन होणे आणि पेमेंट फेल होण्याच्या समस्यांपासून आता प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. रेल्वे या नव्या हाय-स्पीड बुकिंग सिस्टमवर काम करत असून, या प्रणालीमुळे तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

रेल्वेच्या दाव्यानुसार, नवीन प्रणाली एका मिनिटात सुमारे १.५ लाख तिकीट प्रक्रिया करण्यास सक्षम असेल. त्यामुळे विशेषतः तत्काळ तिकीट बुकिंगदरम्यान होणारी गर्दी आणि तिकीटांची मारामारी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

सध्याची व्यवस्था का ठरते अपुरी?

सध्या भारतीय रेल्वेची तिकीट बुकिंग क्षमता प्रति मिनिट सुमारे ३२ हजार तिकिटांपर्यंत मर्यादित आहे. पीक टाइममध्ये लाखो प्रवासी एकाच वेळी लॉगिन करत असल्याने वेबसाइटवर ताण वाढतो. यामुळे वेबसाइट स्लो होणे, सर्व्हर क्रॅश होणे, पेमेंट फेल होणे, लॉगिन एरर आणि तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये अडथळे येतात. विशेषतः सकाळच्या तत्काळ बुकिंगच्या वेळेत प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

नवीन हाय-स्पीड सिस्टम कशी काम करणार?

रेल्वेची ही नवीन प्रणाली अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असेल. ती CRIS (Centre for Railway Information Systems) अर्थात रेल्वे माहिती प्रणाली केंद्राकडून विकसित केली जात आहे. ही प्रणाली एकाच वेळी लाखो यूजर्सच्या लॉगिन आणि बुकिंग रिक्वेस्ट सहजपणे हाताळू शकेल. रेल्वेचे उद्दिष्ट तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक स्मूथ, जलद आणि सुरक्षित बनवण्याचे आहे.

ऑनलाईन तिकीट बुकिंगला मिळणार मोठी चालना

सध्या रेल्वेची जवळपास ८९ टक्के तिकिटे ऑनलाईन बुक केली जातात, तर केवळ ११ टक्के तिकिटे काउंटरवरून घेतली जातात. त्यामुळे नवीन प्रणालीमुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अधिक मजबूत होणार आहे. या नवीन सिस्टीममुळे वेबसाइटची गती वाढेल, कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता सुधारेल आणि बुकिंग अनुभव अधिक सुलभ होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Railways to End Ticket Booking Hassle with High-Speed System

Web Summary : Indian Railways is set to upgrade its ticket booking system for faster, secure transactions. The new system, handling 1.5 lakh tickets per minute, aims to eliminate website slowdowns and payment failures, especially during peak Tatkal hours, enhancing online booking experiences.
टॅग्स :भारतीय रेल्वेआयआरसीटीसीतंत्रज्ञान