Join us

क्रिप्टाे घाेटाळ्यात भारतीय वंशाचा अभियंता संशयाच्या भाेवऱ्यात, एफटीएक्समध्ये उच्चपदावर, काेडिंगवर हाेते नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 09:42 IST

Crypto Scandal: जगातील माेठे क्रिप्टाेकरन्सी एक्सचेंज एफटीएक्स दिवाळखाेरीत निघाल्यानंतर या कंपनीशी संबंधित भारतीय वंशाचे एक अधिकारी निषाद सिंह हे आता संशयाच्या भाेवऱ्यात आले आहेत.

न्यूयाॅर्क : जगातील माेठे क्रिप्टाेकरन्सी एक्सचेंज एफटीएक्स दिवाळखाेरीत निघाल्यानंतर या कंपनीशी संबंधित भारतीय वंशाचे एक अधिकारी निषाद सिंह हे आता संशयाच्या भाेवऱ्यात आले आहेत. ते एफटीएक्सचे संस्थापक सॅम बॅंकमन फ्रायड यांच्या अतिशय जवळचे मानले जातात. ज्या अलामेडा रिसर्च संस्थेत संशयास्पदरित्या अब्जावधी डाॅलर्स वळते केले, त्या संस्थेत निषाद हे २०१७मध्ये रुजू झाले हाेते. निषाद यांनी यापूर्वी फेसबूकमध्येही साॅफ्टवेअर अभियंता म्हणून काम केले. अलामेडा ही एफटीएक्सची सहयाेगी संस्था आहे. तेथे त्यांनी १७ महिने काम केले. त्यानंतर २०१९मध्ये ते एफटीएक्समध्ये रुजू झाले. 

‘व्हिसा’कडून करार संपुष्टात- एफटीएक्स दिवाळखाेरीत निघाल्यानंतर जगातील सर्वात माेठी पेमेंट प्राेसेसिंग कंपनी ‘व्हिसा’ने कंपनीसाेबत केलेला जागतिक क्रेडिट कार्डबाबतचा करार रद्द केला आहे.  - दाेन्ही कंपन्यांनी ऑक्टाेबरमध्ये ४० देशांत एफटीएक्स खात्याशी लिंक व्हिसा डेबिट कार्ड याेजनेची घाेषणा केली हाेती.

अलामेडामध्ये पैसे केले हाेते वळतेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफटीएक्सचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गॅरी वांग, निषाद सिंह आणि सॅम बॅंकमन हे काेडिंगवर नियंत्रण ठेवत हाेते. एफटीएक्समधून अलामेडामध्ये काेट्यवधी डाॅलर्स वळते करण्यात आले हाेते. हा आकडा काहींनी १० अब्ज डाॅलर्स असल्याचा दावा केला आहे. यामुळे क्रिप्टाेच्या विश्वात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीधोकेबाजीआंतरराष्ट्रीय