Join us  

भारतीय आयटी जगात भारी, जगातील अव्वल २५ मध्ये भारतातील 6 कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 6:52 AM

जगातील अव्वल २५ मध्ये भारतातील प्रमुख सहा कंपन्या

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (आयटी) जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. ब्रँड व्हॅल्युएशन करणारी कंपनी ब्रँड फायनान्सच्या ग्लोबल अहवालानुसार, या यादीत इन्फोसिस तिसऱ्या स्थानावर आली आहे. यासह भारताच्या आयटी क्षेत्रातील इतर चार मोठ्या भारतीय कंपन्यांनी अव्वल २५ कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे. 

‘ब्रँड फायनान्स आयटी सर्व्हिसेस २५, २०२२’ अहवालानुसार, टीसीएस आणि इन्फोसिसनंतर अव्वल २५ कंपन्यांच्या यादीत आणखी चार भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. यात विप्रो सातव्या, एचसीएल आठव्या, टेक महिंद्रा १५व्या, एलटीआय २२व्या क्रमांकावर आहे. ३६.२ अब्ज डॉलर ब्रँड मूल्यासह एसेंचर ही जगातील सर्वात मौल्यवान आयटी कंपनी आहे. अमेरिकेची आयटी कंपनी आयबीएम ही चौथ्या स्थानावर गेली आहे. भारताच्या आयटी कंपन्यांमध्ये सर्वाधिक वाढ २०२० ते २०२२ या दरम्यान झाली असून, ती ५१ टक्के इतकी मोठी आहे. यादीत तिसऱ्या क्रमांकांवर इन्फोसिस आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५२ टक्के ब्रँड मूल्यासह वेगाने वाढत आहे.

टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.८ अब्ज डॉलरटीसीएस मागील वर्षाच्या तुलनेत १२ टक्के आणि २०२०च्या तुलनेत २४ टक्के वाढीसह दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. टीसीएसचे ब्रँड मूल्य १६.८ अब्ज डॉलर झाले आहे. या वाढीचे श्रेय कंपनीच्या ब्रँड आणि कर्मचाऱ्यांमधील गुंतवणूक आणि भक्कम आर्थिक कामगिरीला जाते, असे टीसीएसने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले. 

कृत्रिम बुद्धिमत्तेत भारताची मोठी भूमिकाब्रँड फायनान्सने अहवालात म्हटले आहे की, आता घरातून काम करणे सामान्य झाले आहे. हा नवा ट्रेंड जगभर पाहायला मिळत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत डिजिटायझेशनची भूमिका सर्वात महत्त्वाची बनली आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांत आयटी सेवेने सर्वाधिक वेग घेतला आहे. भविष्यात भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि इंटरनेट ऑफ थिंग्जमध्येही मोठी भूमिका बजावेल.

टॅग्स :भारतमाहिती व प्रसारण मंत्रालय