Join us

‘७ ते ८ टक्के वृद्धीसाठी भारताने पाया मजबूत केला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:48 IST

स्थूल आर्थिक घटकांत सुधारणा घडवून भारताने ७ ते ८ टक्के वृद्धीदर मिळविण्यासाठीचे मानक तयार करून पाया मजबूत केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.

नवी दिल्ली : स्थूल आर्थिक घटकांत सुधारणा घडवून भारताने ७ ते ८ टक्के वृद्धीदर मिळविण्यासाठीचे मानक तयार करून पाया मजबूत केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले.जेटली यांनी म्हटले की, मंदी असल्यास वृद्धीदर ७ टक्के राहील. तेजी असल्यास तो ८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकेल. भारत २.५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोन अंकी महागाईचा काळ आता मागे पडला आहे. आमचे महागाईचे स्थिर उद्दिष्ट ४ टक्के आहे. चालू खात्यातील तूट नियंत्रणात ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. गेल्या काही वर्षांत वित्तीय तूटही नियंत्रणात आहे.जेटली म्हणाले की, अनेक वस्तूंवरील जीएसटीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. भविष्यात आणखी काही वस्तूंचे दर व्यवहार्य केले जातील.१० टक्के वृद्धीदर प्राप्त करणे हे मोठे आव्हाननवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका नेतृत्व परिषदेत जेटली यांनी सांगितले की, १० टक्के वृद्धीदर प्राप्त करणे हे भारतासाठी मोठे आव्हान आहे. १० टक्के वृद्धीदर प्राप्त करणे हे केवळ देशांतर्गत घटकांवर अवलंबून नाही. जग कोणत्या गतीने पुढे जाते यावर ते अवलंबून असेल.

टॅग्स :अरूण जेटलीअर्थव्यवस्थाभारत