Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या Indri Whiskey नं पटकावला जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार, दिग्गज ब्रँड्सना टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 13:42 IST

'व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्स' हा वार्षिक कार्यक्रम आहे. या पुरस्कारांमध्ये जगभरातील १०० हून अधिक व्हिस्की प्रकारांचा समावेश आहे.

जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्हिस्कीच्या कार्यक्रमात भारतीय व्हिस्की ब्रँड 'इंद्री'नं कमाल केली आहे. भारतीय व्हिस्की ब्रँड 'इंद्री'ला २०२३ च्या व्हिस्की ऑफ इ वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.'इंद्री' हरयाणातील पिकाडिली डिस्टिलरीजचा एक स्थानिक ब्रँड आ हे. २०२१ च्या पहिल्या ट्रिपल बॅरल सिंगल माल्ट व्हिस्कीच्या रुपात लाँच करण्यात आलेली इंद्री ट्रिनीची ख्याती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे. द संडे गार्डियननुसार गेल्या दोन वर्षांमध्ये इंद्रीनं १४ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहे. भारतीय व्हिस्की इंद्रीनं आपल्या टेस्टमुळे व्हिस्कीच्या चाहत्यांमध्ये आपली छाप सोडली आहे. १०० पेक्षा अधिक व्हिस्की प्रकारव्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड हा एक वार्षिक कार्यक्रम आहे. यामध्ये जगभरातून १०० पेक्षा अधिक व्हिस्कीचे प्रकार सादर केले जातात. एक ज्युरी या सर्वांचं मूल्यांकन करते. इंद्रीनं स्कॉच, बॉरबन, कॅनेडियन, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटिश सिंगल मॉल्ट सह अन्य स्पर्धकांना मागे टाकत पुरस्कार पटकावला आहे.  कार्यक्रमात अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात. 

टॅग्स :व्यवसाय