Join us  

भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल जगातील सर्वात स्वस्त इंधनापेक्षा ४० टक्क्यांनी महाग; पाहा कुठे किंमत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 10:58 AM

इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीये.

Petrol Diesel Price 3 April 2024: इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आजच्या ताज्या अपडेटनुसार म्हणजेच ३ एप्रिल २०२४ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ सुरू आहे.  

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८९.०३ डॉलर्सवर व्यवहार करत आहे, तर WTI क्रूड प्रति बॅरल ८५.१८ डॉलर्सवर व्यवहार करत आहे. जर आपण भारताबद्दल बोललो तर सरकारी इंधन कंपन्यांनी आज सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. 

सर्वात स्वस्त पेट्रोल कुठे? 

आजही भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल ८३ रुपये प्रति लिटरपेक्षा कमी दराने उपलब्ध आहे. तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८० रुपयांपेक्षा कमी आहे. दुसरीकडे, जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल इराणमध्ये केवळ २.३८ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजेच भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोलच्या तुलनेत ते ४० पट स्वस्त आहे. तर, हाँगकाँगमध्ये सर्वात महाग पेट्रोल २६३.४० रुपये प्रति लिटर आहे. 

मुंबईत पेट्रोलचा दर १०४.२१ रुपये आणि डिझेलचा दर ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे.तर आग्रामध्ये पेट्रोल ९४३५ रुपये आणि डिझेल ८७.४१ रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. अहमदाबादमध्ये पेट्रोल ९४.४४ रुपये आणि डिझेल ९०.११ रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. लखनौमध्ये पेट्रोलचा दर ९४.६५ रुपये आणि डिझेलचा दर ८७.७६ रुपये प्रति लिटर आहे. मेरठमध्ये पेट्रोलचा दर ९४.४३ रुपये आणि डिझेलचा दर ८७.४९ रुपये प्रति लिटर आहे.  

टॅग्स :पेट्रोलभारत