Join us
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी सज्ज - मुकेश अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 03:27 IST

डिजिटल क्षेत्रातील सर्वांत मोठे स्थित्यंतर भारत जगाला दाखवून देईल. त्याआधारे २०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी पूर्णपणे सज्ज असेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

नवी दिल्ली : डिजिटल क्षेत्रातील सर्वांत मोठे स्थित्यंतर भारत जगाला दाखवून देईल. त्याआधारे २०२० पर्यंत भारत ‘५जी’साठी पूर्णपणे सज्ज असेल, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. सेल्युलर आॅपरेटर असोसिएशन आॅफ इंडियाची (सीओएआय) ‘इंडियन मोबाइल काँग्रेस’ ही आंतरराष्टÑीय परिषद गुरुवारी सुरू झाली. त्यात अंबानी यांनी हे आशावादी चित्र मांडले.अंबानी म्हणाले, मोबाइल डेटा वापरात भारत जेमतेम वर्षभरात १५५ वरून अग्रस्थानी आला. मोबाइल क्षेत्रात इतका जलद विकास अन्य कुठल्या देशात झाला नाही. २०२० पर्यंत भारतातील प्रत्येक गाव, प्रत्येक मोबाइल फोन ४जीने सज्ज असेल. देशातील चौथी औद्योगिक क्रांती ही डिजिटल क्रांती असेल. रिलायन्स जिओमुळे फक्त ८ महिन्यांत देशाच्या ग्रामीण भागात ५ कोटी नागरिकांच्या हातात स्मार्टफोन आला आहे. जिओचे ग्राहक येत्या काळात आर्टिफिशल इंटेलिजन्सचा अनुभवसुद्धा घेऊ शकतील.

टॅग्स :मुकेश अंबानी